School Holiday Saam tv
मुंबई/पुणे

Pune School Holiday: महत्त्वाची बातमी! उद्या पुण्यातील शाळा- कॉलेजला सुट्टी; कारण काय? वाचा

Pune School-Colleges Closed on 19th January 2026: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील मुख्य रस्त्यावरील शाळा कॉलेज उद्या १९ जानेवारी रोजी बंद राहणार आहेत.

Siddhi Hande

सोमावारी पुण्यातील शाळा राहणार बंद

ग्रँड चॅलेंज टुरनिमित्त शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर

मुख्य रस्त्यावरील शाळा राहणार बंद

विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. १९ जानेवारी म्हणजेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पणे ग्रँड चॅलेंज टुरनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या पुण्यातील अनेक शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.

फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश यामध्ये आहे. ही सर्व कॉलेज आणि शाळा मुख्य रस्त्यावर आहेत. पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ १९ जानेवारी रोजी पुणे शहरात होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळेच शाळेत आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी रस्ते बंद असणार आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्यात अडचणी येतील.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ ही एक सायकलिंग स्पर्धा आहे. यामुळे संपूर्ण शहरात सायकल चालवली जाणार आहे. यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर शाळ आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ती सारखं I Love You म्हणायची, संतापलेल्या विवाहित तरूणाने मुलीचा गळा चिरला अन्...

Toll Plaza: केंद्राचा मोठा निर्णय! आता फक्त FASTag आणि UPIद्वारे भरता येणार टोल; रोख रक्कम पूर्णपणे बंद

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन

SCROLL FOR NEXT