School Holidays: मोठी बातमी! पुढील ५ दिवस राज्यातील शाळांना सुट्टी; कारण काय?

Maharashtra School Holidays for Next 5 Days: शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना पुढील ५ दिवस सलग सुट्ट्या असणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
School Holidays
School HolidaysSaam Tv
Published On
Summary

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पुढील ५ दिवस शाळांना सुट्टी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना पुढचे ५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. मकरसंक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. याचसोबत मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली आहे.

School Holidays
HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

शाळांना सलग ५ दिवस सुट्ट्या (School Holidays For Next 5 Days)

राज्यातील शाळांना उद्या म्हणजेच १४ जानेवारीपासून सुट्ट्या असणार आहे. शाळा आता थेट पुढच्या सोमवारी सुरु होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. यानंतर १५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी आहे. यानिमित्त शाळांना सुट्ट्या असणार आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका झाल्यानंतर शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. यानंतर रविवारी शाळांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्यापासून शाळांना ५ दिवस सलग सुट्टी असणार आहे.

अनेक सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीसाठी ड्युटी लागली आहे. त्यामुळे महापालिका भागातील अनेक शिक्षक इलेक्शन ड्युटीवर आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

School Holidays
ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

मतदान केंद्र असलेल्या शाळा, कार्यालयांना सुट्टी (School Holiday due to MNC Election)

मतदानासाठी ज्या शाळांच्या इमारती, कार्यालये, सभागृह, संस्थांमध्ये मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. त्यासाठी मतदानाच्या पूर्वतयारीसाठी उद्या आणि मतदानाच्या दिवशी या इमारतींमधील कामकाज बंद ठेवले जाणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदानाच्या एकदिवस आधी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप केले जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदीची आदल्या दिवशी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

School Holidays
School Holiday: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी महिन्यात १० दिवस शाळांना सुट्ट्या; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com