Teacher Recruitment: गुड न्यूज! राज्यात ९००० पदांसाठी शिक्षक भरती; या दिवसापासून सुरू होणार अर्जप्रक्रिया

ZP School Teachers Recruitment 2026: राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे. तब्बल ९००० जागांवर ही भरती केली जाणार आहे.
Teacher Recruitment
Teacher RecruitmentSaam Tv
Published On
Summary

राज्यात ९००० शिक्षकांची भरती होणार

मार्च महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात

पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार भरती

शिक्षण होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. सुमारे ९००० शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिनृत्त होणाऱ्या जागांचादेखील समावेश आहे.

राज्यातील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. मार्चपासून ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Teacher Recruitment
Teachers Day Gifts : स्वस्तात मस्त ८ युनिक गिफ्ट आयडिया, शिक्षक होतील खुश

राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. अनेकदा शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसतात. यावर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ५७०० पदे रिक्त आहेत.

२५ मार्च २०२४ च्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या शाळांची २०२५-२६ मध्ये संचमान्यता पूर्ण झाले. यामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदाच समायोजन करणार आहेत. यामध्ये रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरल्या जाणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना २०२६ मेपर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करुन त्याची जाहिरात अपलोड करण्यास सांगितले आहे. पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Teacher Recruitment
Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट

राज्यात एकूण १.९० लाख मंजूर पदे आहेत. यामध्ये सध्या ६००० पदे रिक्त आहेत. यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या २४०० आहे. मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या ५५०० आहे.

Teacher Recruitment
Teacher Recruitment: कामाची बातमी! राज्यात १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी भरती; जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार नियुक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com