साडी विक्रीची जाहिरात, महिलांची चेंगराचेंगरी, 5000 ची साडी फक्त 599 रुपयांत

Saree Sale Chaos During Makar Sankranti: मकरसंक्रांतीचा उत्साह... आणि त्यात सोशल मीडियावर गेल्या 3 महिन्यांपासून फिरणारे रीलस्टार्सचे व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजब प्रकार घडलाय? स्वस्त वस्तुंच्या हव्यासापोटी नेमकं काय घडलं?
Women gather in huge numbers outside a saree shop following a viral Makar Sankranti discount offer in Chhatrapati Sambhajinagar.
Women gather in huge numbers outside a saree shop following a viral Makar Sankranti discount offer in Chhatrapati Sambhajinagar.saam tv
Published On

५ हजार रुपयांची साडी... अवघ्या 599 रुपयांत ! आता ही ऑफर ऐकली की कुठलीही बाई सारासार विचार न करता हातातलं काम टाकून धावणारच . संभाजीनगरमध्येही असंच घडलं. एका साडी सेंटरनं मकरसंक्रांतीनिमित्त 5 हजार रुपयांची साडी... अवघ्या 599 रुपयांत ! विक्रीसाठी बाजारात आणल्याची जाहीरात केली.. आणि दुकानासमोर पहाटेपासूनच महिलांच्या रांगा लागल्या.

दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून जवाहरनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि अखेर बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर दुपारी 2 वाजता हे दुकान बंद करण्यात आलं..

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र केवळ आपली जाहीरात व्हावी म्हणून अशाप्रकारे ऑफर देणारा दुकानदार जसा या घटनेला कारणीभूत आहे तसचं निव्वळ स्वस्तात वस्तू मिळतेय म्हणून हव्यासापोटी धोका पत्करणाऱ्या महिलाही तेवढ्याचं जबाबदार आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com