Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट

Khed Teacher Transfer : खेडमधील दत्तात्रय वारे गुरुजी यांची बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाल्याने पालक आणि शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी बदलीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट
Raigad News Saam Tv
Published On
Summary
  • जालिंदरनगरच्या दत्तात्रय वारे गुरुजींची बदली मावळच्या दुर्गम भागात करण्यात आली आहे

  • पालक आणि शिक्षक वर्गाकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली आहे

  • ग्रामस्थांनी वारे गुरुजींच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे

  • शिक्षणमंत्री दादा भुसे स्वतः शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत

खेड तालुक्यातील एका शिक्षकाच्या बदलीमुळे गावातील पालकांचा आणि इतर शिक्षकांचा राग अनावर झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील जालिंदरनगर शाळेनं इंग्लंडमध्ये झालेल्या T4 Education स्पर्धेत जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामागे असलेल्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच प्रस्तावित बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाली आहे. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आता टीकेची झोड उठली आहे.

शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता एका वेगळ्या उंचीवर नेणारे दत्तात्रय वारे गुरुजी हे नाव शिक्षण क्षेत्रात आदरानं घेतलं जातं. वारे गुरुजींवर झालेल्या आरोपांनंतर त्यांची बदली दुर्लक्षित असलेल्या जालिंदरनगर शाळेत करण्यात आली होती.

Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट
Maharashtra Transport : ओला-उबरसारख्या अ‍ॅप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम, वाचा राज्य सरकारचा नेमका प्लॅन काय?

मात्र, त्यांनी त्या शाळेलाही जागतिक दर्जा मिळवून देत T4 Education स्पर्धेत जगात पहिला क्रमांक मिळवून दिला. आता पुन्हा त्यांची बदली करण्यात येत असल्याने शिक्षकवर्गातून संताप व्यक्त केला जातो आहे. आता जालिंदरनगरचे ग्रामस्थांनी वारे गुरुजींच्या पाठीशी ठामपणे उभे रहावुन बदली विरोधात मोठा लढा उभा करणार असल्याचे म्हणत शिक्षण विभागाला इशारा दिलाय आहे.

दुर्गम भागातील शिक्षकांच्या सततच्या बदलीने पालकवर्ग संतप्त झाला आहे. तर विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या साखळी बदली प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच शिक्षणमंत्री दादा भुसे आज वाबळेवाडी आणि जालिंदरनगर शाळेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे वारे गुरुजींवरील बदलीचं संकट दूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com