School Holiday: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी महिन्यात १० दिवस शाळांना सुट्ट्या; कारण काय?

School Holiday in January 2026 List: जानेवारी महिन्यात अनेक दिवस शाळा बंद असणार आहे. जवळपास १० दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मात्र मज्जा होणार आहे.
School Holiday
School HolidaySaam Tv
Published On
Summary

जानेवारीत शाळांना अनेक दिवस सुट्ट्या

जवळपास १० दिवस शाळा बंद

अनेक राज्यात विंटर हॉलिडे जाहीर

२०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांची मात्र मज्जा होणार आहे. जानेवारी महिन्यातच विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फिरायाला जण्याची आराम करण्याची संधी मिळणार आहे.

School Holiday
School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

जानेवारी महिन्यात न्यू ईअर, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन अशा सुट्ट्या असणार आहे. याचसोबत वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवारीदेखील शाळा बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात सणानुसार सु्ट्ट्या असणार आहेत. जानेवारीत शाळा जवळपास १० दिवस बंद राहणार आहेत.

जानेवारी शाळांना कधी सुट्ट्या? (School Holiday in January 2026 List)

१ जानेवारी- नववर्ष

२ जानेवारी- नवीन वर्ष आणि मन्नम जयंती

३ जानेवारी-हजरत अली यांचा जन्मदिन

१२ जानेवारी- स्वामी विवेकानंद जन्मदिन

१४ जानेवारी- मकरसंक्रांती

१५ जानेवारी- उत्तरायण पुण्यकार, पोंगर,मकर संक्रांती

१६ जानेवारी-तिरुवल्लुवर दिवस

१७ जानेवारी-उझावर थिरुनाल

२३ जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन

याचसोबत जानेवारी महिन्यात रविवार आणि शनिवारीदेखील शाळा बंद असतील. अनेक शाळांना शनिवार- रविवार सुट्टी असते. तर काही शाळांना शनिवारी हाफ डे असतो. त्यामुळे जानेवारी महिना कोणत्याही ट्रीपसाठी एकदम बेस्ट ठरेल. तुम्हाला खूप सुट्ट्या मिळणार आहेत.

School Holiday
Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

थंड प्रदेशात शाळांना जवळपास २० दिवस सुट्ट्या

देशात सध्या थंडी खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना विंटर हॉलिडे जाहीर करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर शाळा जवळपास दीड ते दोन महिना बंद राहतील. जम्मू काश्मीरमध्ये खूप जास्त थंडी आहे. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फ साचले आहेत. यामुळे वाहनांना जाण्यासाठीही जागा नाहीये. राजस्थान, पंजाबमध्येदेखील तापमान खूप कमी आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

School Holiday
January Bank Holiday: जानेवारीत बँकात १६ दिवस राहणार बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com