पराग ढोबळे/ सागर निकवाडे
नागपूर/ नंदुरबार : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला नायलॉन मांजा वापण्यात आला. आता मकरसंक्रांती झाल्यानंतर देखील नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. नागपूरमध्ये विक्री करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नायलॉन मांजामुळे नंदुरबार शहरात एका तरुणाचा गळा कापला गेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा करण्यात येत असतो. यासोबत धोकेदायक असलेल्या मांजाचा वापर करण्यात येत असतो. या मांजामुळे अनेक दुर्घटना घडत असल्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील यंदा ठिकठिकाणी पतंगोत्सव साजरा करताना मांजाचा वापर करण्यात आला. इतकेच नाही तर मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यातील अनेक शहरात मांजामुळे जखमी झाल्याच्या घटना घडल्या. तसेच तीन- चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
नागपूरमध्ये विक्री करणारे अटकेत
मकरसंक्रांतनंतर सुद्धा प्रतिबंधित मांजा विक्रीवर करण्याचा सपाटा सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. यामध्ये राजकुमार निखतराज, सुनील साहू, राहुल सुरेश वर्दे आणि आकाश दिगंबर उईके अशी अटकेतील चौघांची नाव आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांकडून हजारो रुपयांचा नायलॉन मांजासह मुद्देममाल जप्त करण्यात आला. हा मांजा नेमका कुठून आणला याचा शोध पोलीस करत आहेत.
कामावर जाणाऱ्या युवकाचा गळा चिरला
नंदुरबार : नंदुरबार शहरातील उड्डाणपूलालगतच्या मिरची पथारीवर कामाला जाणाऱ्या एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याची घटना घडली आहे. त्याच्या गळ्यापासून आतमध्ये असलेली रक्तस्त्राव करणारी वाहिनीला चिर पडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने डॉक्टरांनी सुमारे शंभरहून अधिक टाके देत शस्त्रक्रीया केल्याने जखमी सुरज युवराज सुळ (वय २३) याचे प्राण वाचले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.