Bengaluru Murder case Saam tv
मुंबई/पुणे

Bengaluru Murder case : पुण्याचं जोडपं, बेंगळुरुत सुटकेस हत्याकांड; मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनाक्रम वाचा

Bengaluru Murder case update : बेंगळुरूत पुण्यातील राकेश खेडेकरने गौरी सांबेकरची हत्या केली. गौरी सांबेकरच्या हत्येचा घटनाक्रम समोर आला आहे. या थरारक घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पुणे : तो पुण्याचा आणि ती मुंबईची. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. क्षुल्लक कारणामुळे सुखी संसारात मीठ कालवलं गेलं. दररोजच्या भांडणाला वैतागून संतापलेल्या नवऱ्याने बायकोची हत्या करून तुकडे तुकडे केले. एवढ्यावरच थांबला नाही तर, मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर सासऱ्याला फोन केला. 'मी तुमच्या मुलीचा खून केलाय'. ही घटना घडली आहे बेंगळुरुमध्ये.

महाराष्ट्रातील पती-पत्नीच्या नात्याचा बेंगळुरुत भयंकर शेवट झालाय. पुण्याच्या राकेश खेडेकरने बेंगळुरुत पत्नी गौरी सांबेकरची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. दोन वर्षांपू्र्वी लग्न झालेल्या जोडप्याचा नात्याचा भयानक अंत झाला आहे. राकेश खेडेकरने पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. राकेश खेडेकरने केलेल्या हत्येचा घटनक्रम समोर आला आहे.

पुण्यातील तरुणाने पत्नीची बेंगळुरुत हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या गौरीची तिच्या पतीने धारदार शस्राने हत्या केल्याचं उघड झालं आहे. राकेश खेडेकरने हत्या केल्यानंतर सासऱ्यांना फोन केला. त्याने फोन करून गौरीची हत्या केल्याचे सांगितले. राकेश खेडेकरने गौरीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे एका सुटकेसमध्ये भरले. गौरीची हत्या केल्यानंतर राकेश खेडेकेर मुंबईच्या दिशेने निघाला होता.

राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचं २ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोन महिन्यापूर्वी दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झालं होतं. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बेंगळूरु पोलिसांनी दोघांची समजूत घातली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. दोघांमधील वाद शिगेला पोहोचून राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत हत्या केली. मध्यरात्री हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्याने जोगेश्वरी येथे राहत असलेल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती.

गौरीची हत्या केल्यानंतर राकेश खेडेकर स्वतःच्या खासगी वाहनाने बेंगळुरूवरून जोगेश्वरीला निघाला होता. मुंबईला निघालेल्या राकेशने येत असताना रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध आणि फीनेल प्यायले. त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार झाल्यानंतर त्याला बेंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

SCROLL FOR NEXT