Kunal Kamra : तुला कापून टाकू; कुणाल कामराच्या टीकेवरून शिंदे गटात भडका, फोनवरून तब्बल ५०० धमक्या

Kunal Kamra News : कुणाल कामराच्या टीकेवरून शिंदे गटात भडका उडाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कामराला फोनवरून तब्बल ५०० धमक्या मिळाल्या आहेत.
Kunal Kamra news
kunal kamra Saam tv
Published On

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. कुणाल कामराला एकनाथ शिंदेंवर केलेल्या गाण्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. कुणाल कामराला धमक्यांचे तब्बल ५०० फोन कॉल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुला कापून टाकू, असं म्हणत कुणाल कामरा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी एकनाथ शिंदे यांना टिप्पणी प्रकरणी कुणाल कामराला नोटीस धाडली आहे. मुंबईतील खार पोलीसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं आहे. 'आम्ही कामराला प्राथमिक चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. त्याच्या विरोधात तपास सुरु करण्यात आला आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाला की, 'मी एकनाथ शिंदे यांच्यावरी टीकेवरून माफी मागणार नाही'. तसेच कामराने मुंबईतील स्टुडिओच्या तोडफोडीवरूनही टीका केली.

Kunal Kamra news
ladki bahin yojana : १६००० लाडक्या बहिणींचे 'आधार' जुळेना; राज्यातील टॉप घडामोडी एका क्लिकवर, वाचा VIDEO

शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईतील खारमधील हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती. कुणाल कामराने शूट केलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. या शोमध्ये 'गद्दार' शब्द उच्चारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्लब आणि हॉटेल परिसराची तोडफोड केली होती. एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. या बंडखोरीवरून कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

Kunal Kamra news
Share Market today : शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी हिरवळ; सेन्सेक्स ७८००० पार, कोणते १० शेअर चमकले?

माफी मागणार नाही - कुणाल कामरा

कुणाल कामराने मोबाईल नंबर व्हायरल करणाऱ्यांवर निशाणा साधला. 'जे लोक मला फोन करण्यात व्यग्र आहे. त्यांना माहीत झालं असेल की, मला सर्व अज्ञात कॉल व्हॉईसमेलवर येतात. तिकडे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल, जे त्यांना आवडणार नाही. मी अजित पवारांसारखीच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मी गर्दीला घाबरणारा नाही. मी अंथरुणात लपून वाद शांत होण्याची वाट पाहणारा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com