Kunal Kamra : कुणाल कामरानं ललकारलं; म्हणाला, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर केला तर..

Kunal Kamra new Post : कुणाल कामरानं शिंदे गटाला पुन्हा ललकारलं आहे. चार पानी स्टेटमेंट पोस्ट करत कुणाल कामराने प्रत्युत्तर दिलं आहे.
Kunal Kamra  News
Kunal Kamra and eknath Shinde.saam tv
Published On

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा एकदा शिंदे गटाला ललकारलं आहे. कुणाल कामराने आणखी एक गाणं पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंवर गाण्यातून टीका केल्यानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओ फोडला होता. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी हॅबिटेट स्टुडिओवर हातोडा चालवला होता. शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीला कुणाल कामराने नवीन पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. 'पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील एक इमारतीत निवडली. तर त्यालाही तोडण्याची गरज आहे, असंही म्हणत कामराने सत्ताधाऱ्यांना ललकारलं आहे.

कुणाल कामराने हम होंगे कामयाब, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना ललकारलं आहे. कुणाल कामराने एका गाण्यातून शिंदेंवर टीका केली होती. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. या गाण्यामुळे राज्यभरात आंदोलने पाहायला मिळाली. त्यानंतर कुणालने पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचलं आहे. कुणाल कामराच्या नव्या पोस्टला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागेल.

दुसरीकडे कुणाल कामराने एक स्टेटमेंट काढत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कुणाल कामराने चार पानांचे स्टेटमेंट ट्विटवर पोस्ट केलं. त्याने त्याने सत्ताधारी आणि शिंदे गटावर टीका केली. कुणालने त्याच्या खास शैलीतून टीका केली.

Kunal Kamra  News
Kunal Kamra : कुणाल कामरानं ललकारलं; म्हणाला, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर केला तर..

'हॅबिटेट हा एक मनोरंजन प्लॅटफॉर्म आहे. हॅबिटेट स्टुडिओ किंवा इतर कोणतेही स्थळ माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. माझं बोलणं आणि कृतींवर कोणतंही नियंत्रण नाही. त्यावर कोणत्याही पक्षाचा अधिकार नाही. विनोदी कलाकाराच्या बोलण्याने एखाद्या स्थळाचे नुकसान करणे म्हणजे तुम्हाला चिकन दिले जात नसेल तर टोमॅटोचा ट्रक उलटवण्याइतका मुर्खपणा आहे', असं तो म्हणाला.

'माझ्या माहितीनुसार आपले नेते आणि राजकीय व्यवस्थेच्या विरोधात तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाही. मी पोलीस आणि कोर्टाला सहकार्य करेल. विनोदामुळे नाराज झालेल्यांना तोडफोड हा कायदेशीर प्रतिसाद वाटणाऱ्यांना हा कायदा योग्य आणि समान रितीने लागू होईल का? आज कोणत्याही नोटिशीशिवाय हॅबिटॅट स्टुडिओ तोडफोड करणाऱ्या पालिका सदस्यांना हा कायदा लागू होईल का? असा सवाल कामराने केला.

Kunal Kamra  News
Share Market today : शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी हिरवळ; सेन्सेक्स ७८००० पार, कोणते १० शेअर चमकले?

'कदाचित माझं पुढचं ठिकाण एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणतं ठिकाण असेल. ते देखील पाडण्याची गरज आहे. माझा फोन नंबर लीक करण्यात आणि मला सतत कॉल करण्यात व्यग्र आहेत. त्यांच्या आतापर्यंत लक्षात आले असेल की, माझ्या व्हॉइसमेलवर अज्ञात कॉल येत आहेत. तिथे तुम्हाला आवडत नसलेले गाणे ऐकू येईल, असे तो पुढे म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com