Share Market today : शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी हिरवळ; सेन्सेक्स ७८००० पार, कोणते १० शेअर चमकले?

Share Market today in Marathi : शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी हिरवळ पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ७८००० पार पोहोचला आहे. बाजारात आज १० शेअर्स चमकले आहेत.
Share Market News
Share Market today Saam tv
Published On

शेअर बाजारात गेल्या ७ दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात सोमवारी तेजी दिसली. त्यानंतर आज मंगळवारी देखील तेजी पाहायला मिळत आहे. बाजार खुलताच सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये गेले. सेन्सक्स इंडेक्स आज ७८००० पार पोहोचला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे निफ्टी-५० जवळपास १०० अंकांनी उसळला आहे. टीसीएस, एचसीएल ते Infosys सारख्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली.

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी

शेअर बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स ७८००० पार पोहोचल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लहर पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरु होताच काही वेळात सेन्सेक्सचा इंडेक्स ७८,४०२.९२ वर पोहोचला. एनएसई निफ्टीचा इंडेक्स २३,६५८.३५ पातळीवरून २३,७५१.५० वर सुरु झाला. त्यानंतर २३,७६६ पर्यंत पोहोचला. शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टी चमकले. दोन्ही इंडेक्स सुरुवातीला काहीसे ढासळले. त्यानंतर अचानक सेन्सेक्स-निफ्टीने तेजी घेतली.

Share Market News
Kunal Kamra : कामराच्या गाण्यावरून महिला नेत्यांमध्ये जुपंली; सुषमा अंधारेंच्या टीकेला ज्योती वाघमारेंकडून गाण्यातून प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

१८४५ शेअर ग्रीन झोनमध्ये

शेअर बाजारात १८४५ कंपन्याच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रेड झोनमधील ४७१ कंपन्यांचे शेअर देखील ग्रीन झोनमध्ये दिसत आहे. तर १२३ शेअरमध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. एल अँड टी, टीसीएस, एक्सिक्स बँक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. Dr Reddy's Labs, Britannia, Tata Steel, SBI Life Insurance मध्ये घसरण पाहायला मिळाली.

Share Market News
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; कुणी केली मागणी?

शेअर बाजारात १० शेअर्स चमकले

शेअर बाजारात १० शेअर्समध्ये सर्वाधिक उसळी पाहायला मिळाली. लार्जकॅप कंपन्यांमधील Infosys Share (2.20 टक्के), HCL Tech Share (2.10 टक्के), टीसीएस शेअर (१.९० टक्के) सारख्या शेअरमध्ये उसळी दिसली. मिडकॅपच्या PSB Share (7.36 टक्के), IREDA शेअर (३.१८ टक्के), टाटा टेक शेअर (२.४७ टक्के) आणि पेटीएम शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. SG Fin शेअर (१६ टक्के), बीएमडब्लू शेअर (७.२६ टक्के) आणि Exicom शेअरमध्ये (४.४३ टक्के) उसळी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com