Pune Rain  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, येत्या २४ तासांत अतिमुसळधार पाऊस कोसळणार; रेड अलर्ट जारी

Heavy Rainfall In Pune: पुण्यामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक रहिवासी वसाहतीमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पुण्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Priya More

पुण्यामध्ये मुसळधार पाऊस (Pune Heavy Rainfall) कोसळत आहे. या पावसामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे पुणे जलमय झाले आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये कमरेइतकं पाणी साचले आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारउपयोगी साहित्य खराब झाले आहे. अशामध्ये पुणेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण पुढच्या २४ तासांत पुण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे राहणार आहे. पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह घाट परिसरात जोरदार पाऊस पडू शकतो. पुण्याला पावासाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरेबियन समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुण्यामध्ये पावसाची बॅटिंग सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढचे २४ तास सतर्क राहावे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथेल मुळा-मुठा नदीला भयानक महापूर आला आहे. नदीच्या जुन्या पुलावरून पाणी जात असून नवीन पुलाला पाणी लागले आहे. तर मांजरी येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन लोणीकंद पोलिसांनी केले आहे. पुण्यातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती लक्षात घेता पुण्यातील शाळा महाविद्यालयांनंतर आता सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातील खिलारेवाडी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुण्यातील खिलारे वाडी येथे पाणी साचल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सहायता करत त्यांना आधी घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

पुणे शहरातील गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद -

लवासा - ४५३ मिलिमीटर

लोणावळा- ३११ मिलिमीटर

चिंचवड - १७५ मिलिमीटर

शिवाजीनगर - ११४ मिलिमीटर

एन डी ए - १६७ मिलिमीटर

तळेगाव - १६७ मिलिमीटर

वडगाव शेरी - १४० मिलिमीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT