Pune village Sold : गाव विकणे आहे; पुणेकरांनी चक्क गावच विकायला काढले, महापालिकेवर राेष

Dhayari : मागण्या मान्य न झाल्यास सुमारे 34 गावातील ग्रामस्थ आगामी काळातील निवडणुकांवर बहिष्कार टाकतील असा इशारा गावक-यांनी पुणे महापालिकेस दिला आहे.
dhayari villagers demand relief from house tax to pune municipal corporation
dhayari villagers demand relief from house tax to pune municipal corporationsaam tv
Published On

- सचिन जाधव

Pune News :

पुणे महापालिकेने (pune municipal corporation) निर्धारित केलेला कर आम्ही भरू शकत नाही. त्यामुळे आमचे गाव महापालिकेने विकत घ्यावे. आम्हांला जाचक कराच्या कारवाईतून मुक्त करावे अशी मागणी धायरी (dhayari) येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केली. काही युवकांनी (youth) गाव विकणे आहे असे फलक देखील झळकविले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून महापालिका सक्तीने आणि तिपटीने टॅक्स वसुली करत आहे. गावातील अनेक बांधकामे अनधिकृत ठरवत महापालिकेकडून सर्रासपणे कारवाई केली जात आहे. (Maharashtra News)

dhayari villagers demand relief from house tax to pune municipal corporation
Yuvak Congress Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याने पुण्यातील युवकांवर गुन्हा दाखल

महापालिकेचा कर ग्रामस्थ भरू शकत नाही. त्यामुळे आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. आम्हांला कराच्या कारवाईतून मुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सुमारे 34 गावातील ग्रामस्थ आगामी काळातील निवडणुकांवर बहिष्कार टाकतील असा इशारा गावक-यांनी पुणे महापालिकेस दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

dhayari villagers demand relief from house tax to pune municipal corporation
Zilla Parishad : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित, अन्यथा कारवाई हाेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com