पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर भुमी धरणाला भेट देण्यचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पर्यटकांना महत्त्वाची सुचना दिलीय. पर्यटकांनी भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंट, पवना धरण, कुंदमळा परिसर या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधबा पाहण्यास असतात. पर्यटकांच पुण्यातील सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे भुशी धरण. भुमी धरण पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. पंरतु गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात संततधार सुरू आहे, यामुळे धरण क्षेत्रामध्ये तसेच नदीपात्रामध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. पावसाळी सहलीचा आनंद लुटताना काही अनुचित प्रकार घटना घडून नये, यासाठी नागरिकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटनास जाण्याचे टाळावे अशा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.