Pune news  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? खड्ड्यांवर बोलाल तर जेलमध्ये जाल, यूट्युबर संतोष पंडित यांना अटक

Santosh Pandit Arrested: पुण्यातील नागरी समस्या मांडणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ तयार केला होता.

Rohit Kadam
  • पुण्यात युट्युबर संतोष पंडित यांना अटक

  • संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली

  • चंद्रकांत पाटील यांच्यावर संतोष पंडितांचा व्हिडीओ

  • सोशल मीडिया व्हिडीओवरून पुण्यात युट्युबरला अटक

  • पुण्यातील नागरी समस्या मांडणाऱ्या संतोष पंडितांना अटक

शहरातील नागरी समस्यांमुळे पुणेकर अक्षरशः मेटाकुटीला आलेत. रस्त्यावरचा खड्डा असो की अनाधिकृत बांधकाम पुण्यातील या नागरी समस्या मांडणाऱ्या संतोष पंडितांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केलीये. मात्र पंडितांच्या अटकेमागे नेमकं कोणतं कारण आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...

ऐकलंत... हे आहेत पुण्यातील नागरी समस्या मांडणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित... संतोष पंडित यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरसेविका मिताली साळवेकर यांच्यावरील व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर एका महिलेनं संतोष पंडित यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री घरी धडक देत संतोष पंडित यांना अटक केली. एव्हंढच नाही तर त्यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केलाय. दरम्यान, संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला तो व्हिडीओ तुम्ही एकदा जरूर पाहा...

आता या दोन व्हिडिओंबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय. दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना HSRP नंबर प्लेट का बसवली नाही म्हणून याच संतोष पंडित यांनी जाब विचारला होता. आमदार असून तुम्ही कायदा पाळत नाही असा प्रतिसवाल करत पडळकरांची बोलती बंद केली. एव्हंढच नाही तर गेल्या महिन्यात संतोष पंडित यांना राहत्या घरातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर त्यांना फोन करून जीव मारण्याच्या धमक्या दिल्या.

खरंतर, पुण्यातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि फुटपाथवरील परप्रांतियांच्या स्टॉलवरून पुणेकर संताप व्यक्त करताहेत. याच समस्यांवरून सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा अशा प्रकारे आवाज दाबणं कितपत योग्य आहे? पंडित यांच्या व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. मात्र जी तत्परता पंडितांबाबत पोलीसांनी दाखवली ती इतर गुन्ह्यांबाबत दाखवतात का? हा खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट? महापालिकेने मागितले ८ टीएमसी पाणी

राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

Weather : दिल्लीसह १५ राज्यांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात काय स्थिती? हवामान खात्याचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT