Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

Lower Back Pain Causes : दिवसभर बसून काम करणे, सतत मोबाईल पाहणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये कंबरदुखीचा त्रास वाढत आहे. कंबरदुखीची प्रमुख कारणे, लक्षणे आणि वेदना टाळण्यासाठी करायाचे सोपे उपाय जाणून घ्या.
Back Pain Lifestyle News
Back Pain Lifestyle News AI Image
Published On: 

Back Pain Increasing Simple Lifestyle Changes आजकाल अनेकजण दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करतात. काहीजण तासनतास मोबाईल पाहत असतात, तर काहींचा बराच वेळ प्रवासात जातो. या सगळ्या धावपळीत आपण आपल्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष करतो. याचाच परिणाम म्हणजे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना कंबदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. कंबर दुखू लागली की आपण फार त्याकडे लक्ष देत नाही. मात्र हे दुखणं कॅन्सरसारख्या आजारांपेक्षा देखील मोठं आहे. यावर लाखोने खर्च केला तरी यावर उपाय नाही असे एका संशोधनातून समोर आले आहे.

कंबरदुखी ही आता केवळ वयस्कर लोकांची समस्या राहिलेली नाही. अगदी २० ते ३० वयोगटातील तरुणांनाही या त्रासाचा सामना करावा लागत आहे. २०२३ मध्ये 'द लॅन्सेट रूमेटोलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जगभरात सुमारे ६१.९ कोटी लोकांना कंबरेच्या खालच्या भागात वेदना होतात. १९९० च्या तुलनेत ही संख्या जवळपास ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०५० पर्यंत हा आकडा ८४.३ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

Back Pain Lifestyle News
Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

नेमक्या कोणत्या सवयींमुळे वाढतो कंबरदुखीचा त्रास?

एकाच जागी अनेक तास बसून राहणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी होणे ही कंबरदुखीची काही महत्त्वाची कारणे आहेत. विशेषतः लॅपटॉपवर काम करताना बराच वेळ बसणे किंवा मोबाईल पाहताना सतत मान आणि पाठ वाकवून ठेवणे यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. याशिवाय वजन वाढणे, जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे आणि अपुरी झोप यांचाही शरीरावर परिणाम होतो. शेती, बांधकाम, कारखाने आणि इतर मेहनतीच्या कामांमध्ये असलेल्या लोकांनाही हा कंबर दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.

Back Pain Lifestyle News
Breaking News : सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

कंबरदुखीपासून दूर राहण्यासाठी काय कराल?

कंबरदुखी टाळण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल करणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये सतत बसून काम करत असाल, तर दर ३० ते ६० मिनिटांनी उठून थोडे चाला. रोज किमान २० ते ३० मिनिटे चालणे, हलका व्यायाम करणे आणि शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. बसताना पाठ सरळ ठेवावी आणि पाय जमिनीवर टेकतील अशा पद्धतीने बसावे. जड वस्तू उचलताना कंबरेऐवजी गुडघे वाकवावेत. तसेच शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे आणि पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नका. वेदना सतत होत असतील किंवा वाढत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायात अचानक अशक्तपणा, लघवी किंवा शौचावर नियंत्रण राहण्यात अडचण अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. तुमच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये केलेले बदल तुमच्या पाठीचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवण्यास मदत करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.