Breaking News : सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Pune NCP Leader Devram Lande Resign : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी १० कोटींच्या कथित आरोपानंतर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Devram Lande Resigns News
Devram Lande Resigns News AI image
Published On: 

सागर आव्हाड, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे नेते देवराम सखाराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

देवराम लांडे आणि त्यांचे पुत्र अमोल लांडे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या एका व्हिडिओमुळे हे प्रकरण चर्चेत आले. या व्हिडिओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे, तसेच आदिवासी सरपंच आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्यावर टीका केल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय, एका कंपनीला आदिवासींच्या जमिनी मिळवून देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही या क्लिपमधून करण्यात आला आहे.

Devram Lande Resigns News
Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देवराम लांडे यांनी व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी मनसे कार्यालयात जाऊन राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली. राज ठाकरे हे आपले दैवत असून आपण त्यांच्याबद्दल कधीही अपशब्द वापरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Devram Lande Resigns News
Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

दरम्यान, लांडे यांनी या कथित क्लिप्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. काही राजकीय विरोधकांकडून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये आणि पक्षाला कोणतीही राजकीय अडचण निर्माण होऊ नये, या कारणाने चौकशी पूर्ण होईपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे लांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांचा हा निर्णय पक्षावरील नाराजीमुळे नसून पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता पोलीस चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचे सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.