Shruti Vilas Kadam
शरीरात लोह कमी झाल्यास सतत थकवा जाणवू शकतो. तसेच केस कमकुवत होऊन गळू लागतात. त्यामुळे आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.
व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. केसांच्या वाढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करा.
थायरॉईडचा त्रास असल्यास केस गळणे, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे आणि सतत थकवा जाणवणे अशा समस्या होऊ शकतात.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यास सतत थकवा, आळस आणि शारीरिक संबंधांमधील इच्छा कमी होऊ शकते. काही वेळा केसांमध्येही बदल दिसू शकतात.
जास्त तणाव घेतल्यामुळे केसगळती वाढू शकते. तसेच सतत थकवा आणि आळस जाणवू शकतो. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यास थकवा, अशक्तपणा आणि थोडे काम केल्यावरही धाप लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गरजेनुसार रक्त तपासणी करून घ्या.
शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसगळती, वजनातील बदल आणि सतत थकवा जाणवू शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.