Shruti Vilas Kadam
कमी पाणी प्यायल्यामुळे किडनीला शरीरातील घाण बाहेर टाकण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
डोकेदुखी किंवा अंगदुखीवर वारंवार पेनकिलर घेतल्यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
चिप्स, लोणचे आणि पॅकेटमधील पदार्थांमध्ये मीठ जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढून किडनीवर परिणाम होऊ शकतो.
रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढल्यामुळे किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे नियमित तपासणी करा.
वारंवार लघवी रोखून ठेवल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लघवी जास्त वेळ रोखू नका.
गरजेपेक्षा जास्त प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणातच प्रोटीन खा.
रोज उशिरापर्यंत जागल्यामुळे रक्तदाब आणि साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दररोज ७ ते ९ तास झोप घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.