Dark Chocolate for Period: डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच कमी होतो मासिक पाळीचा त्रास? जाणून घ्या सत्य!

Shruti Vilas Kadam

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते. यामुळे स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.

dark chocolate minerals

मूड चांगला राहतो

मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना चिडचिड होते. अशावेळी डार्क चॉकलेट खाल्ल्याने मूड चांगला राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मन प्रसन्न वाटते.

Dark Chocolate for Period

पोटदुखी पूर्णपणे थांबत नाही

डार्क चॉकलेट खाल्ल्याने मासिक पाळीतील पोटदुखी पूर्णपणे थांबते असे नाही. काही महिलांना यामुळे थोडा आराम मिळू शकतो. मात्र, प्रत्येकाला याचा फायदा होईलच असे नाही.

Dark Chocolate for Period | Google

७० टक्के कोको असलेले चॉकलेट खा

डार्क चॉकलेट खरेदी करताना त्यात ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोको आहे का ते पाहा. अशा चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण देखील तपासा.

Dark Chocolate for Period

जास्त चॉकलेट खाऊ नका

डार्क चॉकलेट जास्त खाल्ल्याने पोट फुगणे किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात खावे. चॉकलेटमध्ये साखर आणि कॅफिनही असते.

Dark Chocolate for Period | Saam Tv

पोटाला गरम शेक द्या

मासिक पाळीत पोट दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकावे. यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. तसेच हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग करावे.

Dark Chocolate for Period

भरपूर पाणी प्या

मासिक पाळीदरम्यान दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. हलका व्यायाम करावा आणि शरीराला विश्रांती द्यावी. पोटात खूप दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.पोटदुखी पूर्णपणे थांबत नाही

Dark Chocolate for Period | yandex

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Dark Chocolate for Period

Mangalsutra Vati Design: नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या हटके वाटी डिझाइन्स; पारंपरिक अन् मॉडर्न कलेक्शन पाहिलंत का?

Mangalsutra Vati Design | Saam Tv
येथे क्लिक करा