पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Kamat Kaka Statement On DJ Sound System During Pune Ganeshotsav: पुण्यातील गणेशोत्सव आणि डीजे साऊंडच्या वादावर ‘एनर्जीमॅन’ कामत काकांनी आपले स्पष्ट मत मांडले. डीजेला मापदंड असावा, मात्र कायमची बंदी नको, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
Pune Ganeshotsav DJ sound limits and celebration rules
Pune Ganeshotsav DJ sound limits and celebration rulessaam tv
Published On

डीजे साऊंड सिस्टिम साठी मर्यादा आणि मापदंड लावून वाजवले गेले तर निश्चितपणे गणेशोत्सवाचा आनंद सगळ्यांना मिळू शकतो अशी भावना सोशल मीडिया वर प्रसिद्ध असलेल्या धनंजय कामत म्हणजेच कामत काका यांनी व्यक्त केल्या आहेत. सध्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने डीजे साऊंड सिस्टिम बाबत अनेक वादविवाद सुरू आहेत. अनेक पर्यावरण प्रेमींनी गणेशोत्सवात लागणाऱ्या लाऊड स्पीकरवर कायमस्वरूपी बंदी यावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी ही मागणी धुडकावून लावत साऊंड सिस्टिम मध्ये असणाऱ्या प्लाजमा आणि प्रेशर मिड या यंत्रांचा वापर होणार नाही याची ग्वाही देत गणेशोत्सव तेवढ्याच उत्साहाने डीजेची मर्यादा लावून साजरी करू असं मत व्यक्त केलंय.

पुण्यातल्या कर्वेनगर आणि सिंहगड रोड भागात कामत काका अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आहेत. अगदी लहानपणापासून एका कार्यकर्त्याला गणेशोत्सवात दरम्यान पडलेली काम त्यांनी सर्वतोपरी केलेली आहेत. गणेशोत्सव दरम्यान छोट्या छोट्या कामातून विसर्जन मिरवणुकी दरम्यान नाचण्याचा आनंद वृद्धिंगत होत गेला आणि त्यातून ही आवड लागली असं मत कामत काका यांनी व्यक्त केलं आहे. गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव नसून पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्याचा एक स्रोत आहे. गणेशोत्सव जर मापदंड लावून साजरी केला तर जगाच्या पाठीवर हा उत्सव एक बेंचमार्क ठरेल असेही ते म्हणाले.

Pune Ganeshotsav DJ sound limits and celebration rules
आवाज कमी करा, मोठा करा पण एकदा काय ते ठरवा! पुणे महापालिकेतील गणेश मंडळाच्या बैठकीत काय घडलं?

सध्या सुरू असलेल्या डीजेच्या बाबत त्यांना विचारलं असता, यांनी बदल हा एका रात्रीत घडत नसतो अशी प्रतिक्रिया दिली. तसंच डीजे मध्ये वापरली जाणारी यंत्र जी कर्णकर्ता ठरतात ती वापरली नाहीत तर निश्चितपणे एक चांगला उत्सव साजरी करता येईल. यासोबतच गाणी तयार करताना असलेला सेंसर किंवा एक नियमावली असणं गरजेचं आहे. जी लहान मुलं गणेशोत्सव किंवा इतर कुठल्याही सणाच्या दरम्यान ट्रॅक्टर वर चढून बिभतसपणे नृत्य करतात यांना सुद्धा चाप लावणं तितकंच गरजेचं आहे समज कामात काकांनी व्यक्त केलं आहे. आयुष्यात एकदा तरी पुण्याची विसर्जन मिरवणूक प्रत्येकाने अनुभवावी. आपल्याला नाचता येणे म्हणजे परमेश्वराची देणगी आहे. प्रत्येकालाच पब मध्ये जाऊन नाचता येत नाही. असंच गणेश मंडळाचा कार्यकर्ता तर या विसर्जन मिरवणुकीची प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीचे अलौकिक वैभव आहे अशा भावना कामत काकांनी व्यक्त केल्या आहेत.

Pune Ganeshotsav DJ sound limits and celebration rules
Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

१. डी जे साउंड सिस्टिम बद्दल आवड कशी लागली?

मी लहानपणापासून पुण्यातील कर्वेनगर मधील शहीद गणेश मंडळाचा कार्यकर्ता होतो. अनेक छोटी छोटी कामं मी तिथे करायचो. फक्त गणेशोत्सव नाही तर इतर उत्सवांच्या काळात कार्यकर्त्यांसोबत काम करायचो.

चांगला नाचत असलेल्या व्यक्तीला जास्त भेळ आणि मसाला दूध मिळायचे आणि त्यानंतर वाह वाह झाला. नाचता नाचता आनंदाकडे ओढल्या गेलो मला त्याच्यातून मोठा आनंद मिळतो आणि मी तो आनंद इतरांना सुद्धा देतो

२. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव बदलला?

निश्चित बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी गुलाल वापरत होतो आता तो बंद झाला. आधी हलगी होती नंतर ढोल ताशा आला आता डी जे सिस्टिम आली. कालांतराने उत्सवाची परिभाषा बदलली आहे.

३. उत्सवात डी जे वर मर्यादा आणल्या पाहिजे?

कुठला ही आनंद साजरा करताना आपल्याला कानाला, डोक्याला, मेंदूला त्रास झाला नाही पाहिजे. या त्रासामध्ये अनेकांना आनंद मिळतो पण ते चांगलं नाही. लाईट सुद्धा त्रासदायक नसू नये. प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे.

४. डी जे नको किंवा डी जे पाहिजे याबाबत समतोल साधता येऊ शकतो का?

सगळ्या लोकांना आनंद घेता येऊ शकतो. प्रेशर मिड आणि प्लाझ्मा मोठ्या प्रमाणावर या गोष्टींचा मेंदू आणि कानावर पडतो. या गोष्टीनं आळा घातला तर वेगवेगळ्या गाण्यावर आपण निश्चित चांगलं नाचू शकतो. कायमची बंदी आणि मापदंड ठेऊन वाजवणे यात फरक आहे.

५. मर्यादा लावून डी जे साउंड सिस्टिम वाजवला जाऊ शकतो?

मापदंड असायला पाहिजे. कुठली ही गोष्टी मर्यादित असाव्या. या सगळ्या गोष्टींना माप लावा आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळेल

६. अश्लीलपणे नाचणाऱ्या लहान मुलांवर लक्ष देणे गरजेचे?

आपल्या पुढच्या पिढीला आपण काय सांगतोय हे समजणे गरजेचे आहे. लहान वयात असलेल्या मुलांना माहिती नसेल. गाणी वाजवताना आणि बनवताना एक सेन्सर पाहिजे.

७. गणेशोत्सव म्हणजे फक्त डी जे का?

गणेशोत्सव एक प्रणाली आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. अनेकांची पोटा पाण्याची सोय होते. मी गणपतीचे सगळे दिवस कुठली ही कामं न करता फक्त उत्सवासाठी तयार असतो. विसर्जन मिरवणूक आणि डी जे सोडून अनेक गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे.

डी जे ला मापदंड लावून गणेशोत्सव आनंदाने साजरा केला जाऊ शकतो

रोजच्या कामातून आपण जातो यातून एक एनर्जी मिळणे गरजेचे आहे. या गोष्टीत फक्त मर्यादा पाळल्या गेल्या तर पुण्याचा गणेशोत्सव बेंचमार्क ठेवला जाऊ शकतो

पुण्याच्या गणेशोत्सवाची पी एच डी व्हायला पाहिजे

८. गणेश मंडळाच्या कार्यकर्ता ची व्याख्या म्हणजे नेमकी काय?

नाचणे म्हणजे स्वतःचा attitude दाखवणे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता वर्षभर विसर्जन मिरवणुकीची वाट बघत असतो. मिरवणुकीचा आनंद मिळणे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

एकदा तरी आयुष्यात पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत या

आपल्याला नाचता येणे म्हणजे परमेश्वराची देणगी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com