Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! पुण्यात पालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या दारू पार्टी, १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी

Pune Dr Babasaheb Ambedkar Student Hostel: पुण्यातील पालिकेच्या विद्यार्थांसाठी असेलल्या वसतीगृहामध्ये दारु पार्टीचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातून (dr babasaheb ambedkar student hostel) मोठी बातमी समोर येत आहे. या वसतीगृहामध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी दारू पार्टी करत धांगडधिंगा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्याने इतर शांत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटं, तंबाखूची पाकिटं सापडली आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाने १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये चांगले शिक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे पुणे महापालिकेने घोले रस्त्यावर १०८ खोल्यांचे मोठे वसतीगृह बांधले आहे. या वसतीगृहामध्ये ४०० जणांची राहण्याची सोय आहे. पुणे शहरामध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो. महत्वाचे म्हणजे महापालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना जेवणाच्या खर्चासाठी दरमहा २ हजार १५० रूपये इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. या वसतीगृहात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच ईडबल्यूएस प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

या वसतीगृहात अकरावी किंवा पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडणे अपेक्षित असते. पण असे असतानाही काही विद्यार्थ्यांनी वसतीगृह सोडले नाही. सध्या ४०० पैकी २२० विद्यार्थी हे जुने आहेत. यामधील काही जण पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून या वसतीगृहामध्ये राहत आहेत. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश मिळत नाहीये. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

सर्व सोयीसुविधा मिळणाऱ्या या वसतीगृहामध्ये विद्यार्थी दारु पार्टी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पुणे महापालिकेच्या पथकाने वसतीगृहावर धाड टाकली. या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं, तंबाखूची पाकिटं सापडली आहेत. दारू पार्टीचा हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाने १४ विद्यार्थ्यांची वसतीगृहातून हकालपट्टी केली. तसेच सुरक्षा विभागाकडे सात सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT