Pune Bogus Schools
Pune Bogus SchoolsPune Bogus Schools

Pune Bogus Schools : पुण्यात बोगस शाळांची फॅक्ट्री, साम इन्व्हेस्टिशनमधून धक्कादायक वास्तव उघड

Pune Bogus Schools News : आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते. मात्र विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातच तब्बल 49 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Published on

अक्षय बडवे, भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते. मात्र विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातच बोगस शाळांची फॅक्ट्री समोर आलीय. पुण्यात तब्बल 49 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरु असते. त्यातच पालक अव्वाच्या सव्वा शुल्क भरुन आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत असतात. मात्र आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुणेच बोगस शाळांची फॅक्ट्री बनल्याची धक्कादायक माहिती साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलीय....तर बोगस शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने पालकांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 49 शाळांची यादीच प्रसिद्ध केलीय.

पुणे महापालिकेसह हवेली तालुका- 15 शाळा बोगस

दौंड तालुक्यात 11 शाळा बोगस

पिंपरी चिंचवडमधील 11 शाळा बोगस

पुरंदरमध्ये 1 शाळा बोगस

मावळमध्ये 4 शाळा बोगस

खेडमध्ये 1 शाळा बोगस

मुळशीत 6 शाळा बोगस

Pune Bogus Schools
Mumbai Rain Video: मुंबईत कोसळधार! सखल भागांमध्ये साचले पाणी, रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी; कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल

आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही शाळा ही प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय आणि शाळेला ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय शाळा सुरु करता येत नाही. मात्र त्यानंतरही शाळा चालवल्या जात असल्याने त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकवाडेंनी म्हटलंय...तसंच अनधिकृत आणि बोगस शाळेत मुलांचा प्रवेश करू नये, असं आवाहन करण्यात आलंय.

पुण्याच्या शिक्षण विभागाने बोगस शाळांची यादी जाहीर करुन लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर बोगस शाळांकडून 1 लाख रुपयांचा दंड आणि शाळा बंद न झाल्यास दररोज 10 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. मात्र या शाळा परवानगी नसताना कशा सुरु आहेत? त्यावर दंडात्मक कारवाई करून हा मुद्दा संपवण्यापेक्षा या बोगसगिरीवर घाव घालून पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक टाळायला हवी.

Pune Bogus Schools
Mumbai Rain Video: मुंबईत कोसळधार! सखल भागांमध्ये साचले पाणी, रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी; कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com