Pune School: ५० अनधिकृत शाळांवर कारवाई होणार, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुढे काय?; समोर आली मोठी अपडेट

Action Against Unauthorized Schools: पुण्यामध्ये ५० शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. ५० शाळांपैकी ४९ शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. या शाळांविरोधात कारवाई होणार आहे.
Pune School: ५० अनधिकृत शाळांवर कारवाई होणार, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुढे काय?; समोर आली मोठी अपडेट
Action Against Unauthorized Schools Saam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील ५० शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली होती. पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी चिंचवडमधील ११ शाळांचा यामध्ये समावेश आहे. या अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अशामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. या ५० शाळांपैकी ४९ शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. या शाळांविरोधात कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे (Pune zilla parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ४९ अनधिकृत शाळा या इंग्लिश माध्यमांच्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात ४५ शाळा बेकायदेशीर आहेत आणि ४ नियमबाह्य आहेत. नोटीस बजावल्यानंतर जर शाळा सुरू राहिल्या तर या शाळेला प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतर देखील शाळा सुरू राहिली तर प्रतिदिनी १० हजार रुपये असा दंड आकारला जाईल.

Pune School: ५० अनधिकृत शाळांवर कारवाई होणार, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुढे काय?; समोर आली मोठी अपडेट
Pune Zika Virus Update: पुण्यात झिकाचा धोका वाढला, आणखी एकाला लागण; रुग्णसंख्या १६ वर

अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर बोलताना संतोष पाटील यांनी सांगितले की, 'विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत ट्रान्स्फर केले जाणार आहे. ज्या पालकांनी फी भरली आहे. त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये ट्रान्स्फर केले जाईल.' तसंच, 'कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.', अशी ग्वाही देखील जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

Pune School: ५० अनधिकृत शाळांवर कारवाई होणार, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुढे काय?; समोर आली मोठी अपडेट
Leopard in Pune: अर्रर्र! महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी, पाहा VIDEO

तसंच, 'पुण्यातील ४९ अनधिकृत शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या शाळांना मान्यता नाहीये त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. कारवाई करून सुद्धा शाळा बंद केल्या नाहीत तर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.' असे देखील संतोष पाटील यांनी सांगितले.

Pune School: ५० अनधिकृत शाळांवर कारवाई होणार, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुढे काय?; समोर आली मोठी अपडेट
Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेत १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; विविध पदांसाठी सुरु आहे भरती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com