Leopard in Pune: अर्रर्र! महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी, पाहा VIDEO

Leopard Entered In Mahavitaran Office At Pune's Rajgurunagar: महावितरण कार्यालयात बिबट्या शिरल्याची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.
Leopard in Pune: अर्रर्र! महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी, पाहा VIDEO
Leopard In Pune's Mahavitaran OfficeSaam TV

रोहिदास गाडगे, साम टीव्ही राजगुरुनगर

राजगुरुनगरमध्ये बिबट्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. बिबट्या थेट महावितरण कार्यालयात शिरल्याची घटना राजगुरुनगर (Rajgurunagar) शहरालगत चांडोली येथे घडली आहे. महावितरण कार्यालयात शिरलेल्या बिबट्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं (Pune News) होतं. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला थेट महावितरण कार्यालयात कोंडलं. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रणाणावर व्हायरल होतोय.

बिबट्याला थेट महावितरण कार्यालयात कोंडलं

मागील पाच दिवसांपासुन बिबट्या मादीसह बछडे महावितरण कार्यालगत दिसुन आले होते. महावितरण कर्मचाऱ्यांनी बिबट्याला कार्यालयात कोंडल्याची घटना राजगुरूनगरमध्ये घडली होती. बिबट्या महावितरण कार्यालयात शिरल्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घामु फुटला होता. बिबट्याने त्यांची पळता भुई थोडी केल्याची घटना (Leopard Entered In mahavitaran Office) कॅमेऱ्यात कैद झालीय. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे घटनेची चर्चा सकाळपासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

हिंगोलीतील घटना

हिंगोलीमध्ये रेस्क्यु करण्यात करण्यात आलेल्या बछड्याला (Leopard) मादी बिबट्या जंगलात घेऊन जातानाचा व्हिडियो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव बांध गावात घडली आहे. सिरेगाव बांध गावातील नामदेव गहाणे यांच्या घरी नवीन सौचालयाचे बांधकाम सुरु असताना ७ फूट खोल खड्ड्यात बिबट्याचा बछडा पडला होता.

Leopard in Pune: अर्रर्र! महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी, पाहा VIDEO
Nashik Leopard Video: नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम; काळजात धडकी भरवणारं दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ही घटना संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली होती. त्यानंतर लगेच नवेगाव बांध येथील रेस्क्यू टीमने खड्ड्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढले होते. त्याठिकाणी एका प्लस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवले होते. त्यानंतर मादी बिबट्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येत कॅरेटमधून बिबट्याला बाहेर काढून जंगलाच्या दिशेने घेऊन गेलीय. ही घटना कॅमेऱ्यामध्ये हिंगोलीत कैद झाली आहे.

Leopard in Pune: अर्रर्र! महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी, पाहा VIDEO
Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com