भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यात मानव-बिबट्या संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच बिबट्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मृत्यू होत असल्याने बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी बिबट्याची नसबंदी हाच पर्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणूकीत म्हटलं होतं. मात्र बिबट्यांच्या नसबंदीचा राज्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळून लावल्याची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत दिलीय...
पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 36 लोकांचा मृत्यू झालाय. तर 108 लोक गंभीर जखमी झालेत.
याबरोबरच बिबट्यांनी 12 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केलीय. त्यामुळे पुणे जिल्ह्यात बिबट्याची मोठी दहशत पसरलीय. गेल्या 25 वर्षात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ होत चाललीय...
2001- 15 ते 20 बिबटे
2005- बिबट्यांची संख्या 100 पार
2008-2010- बिबट्याचे वावरक्षेत्र वाढलं
2013-2015- बिबट्यांची संख्या 300 पार
2018-19- बिबट्यांची संख्या 450 पार
2022- बिबट्यांची संख्या 550 पार
2023-24- बिबट्यांची संख्या 700 पार
केंद्राने बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार आणि जुन्नरमधील नागरिकांना कसा दिलासा देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बिबट्यांच्या हल्ल्याचे पडसाद लोकसभा निवडणूकीला उमटले. मात्र विधानसभा निवडणूकीपुर्वी ठोस उपाययोजना न केल्यास पुणे जिल्ह्यातील बिबट्या महायुतीला घायाळ करण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.