Sangli ZP News: कन्नड शाळांमध्ये चक्क मराठी शिक्षकांची नियुक्ती, सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार; काँग्रेस आमदार आक्रमक

Sangli Latest News: कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
Sangli News: कन्नड शाळांमध्ये चक्क मराठी शिक्षकांची नियुक्ती, सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार; काँग्रेस आमदार आक्रमक
Sangli Latest News: Saamtv

सांगली, ता. १६ जून २०२४

सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार समोर आला असून कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जत तालुक्याचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. या कन्नड शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याचा आरोप करत काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सांगली जिल्हा परिषदेचा पवित्र पोर्टल मध्ये भोंगळ कारभार झाल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. कन्नड शाळेतील कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसे शिकवणार ? असा सवाल आमदार सावंत यांनी उपस्थित केला असून कन्नड शाळेतल्या मराठी माध्यम शिक्षकांच्या नियुक्ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Sangli News: कन्नड शाळांमध्ये चक्क मराठी शिक्षकांची नियुक्ती, सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार; काँग्रेस आमदार आक्रमक
UPSC Prelims Exam 2024: गुगल मॅपचा घोळ, UPSC परीक्षेपासून विद्यार्थी वंचित! ३ मिनिटे उशिर झाल्याने प्रवेश नाकारला

दरम्यान, जत तालुक्यातल्या कर्नाटक सीमेवर राज्य सरकारच्या 132 कन्नड शाळा आहेत. अशातच आता काही शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ते कन्नड विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Sangli News: कन्नड शाळांमध्ये चक्क मराठी शिक्षकांची नियुक्ती, सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार; काँग्रेस आमदार आक्रमक
Nagpur Accident Video: ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबला, नागपुरात भरधाव कारने ५ जणांना उडवलं; अल्पवयीन मुलगा ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com