Nagpur Accident Video: ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबला, नागपुरात भरधाव कारने ५ जणांना उडवलं; अल्पवयीन मुलगा ताब्यात

Minor Driver Speeding Car Hit 5 People At KDK Chowk: नागपुरातील केडीके चौकात भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे.
नागपुरमध्ये पुन्हा हिट अॅंण्ड रन
Nagpur Accident CCTVSaam Tv

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

नागपुरातील केडीके चौकात भरधाव कारने पाचजणांना उडवल्याची घटना घडली. या अपघातातील कारचालक अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. नागपुरमधील केडीके चौकात ही भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. टर्न घेतांना कारच्या ब्रेकऐवजी एकसिलेटरवर पाय पडला. त्यामुळं कारच सुटले नियंत्रण अन् अपघात झाला.

या अपघातामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीपाला दुकानात कार (Nagpur Accident News) घुसली. त्यामुळे दोन दुकानदार आणि तीन ग्राहक जखमी झाले आहेत. हा अल्पवयीन आरोपी वाठोडा परिसरात गॅरेजमध्ये काम करत असल्याती माहिती मिळत आहे. यावेळी कार दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आली होती. ही कार पार्क करण्यासाठी रस्त्यावर आणली आणि अपघात झालाय.

या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी कारमालक, गॅरेज मालक आणि अल्पवयीन मुलगा अशा तिघांवर गुन्हा दाखल केला (Speeding Car Hit 5 People) आहे. ही घटना काल १५ जून रोजी घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय. मागील तीन आठवड्यातील अपघाताची ही तिसरी (Hit And Run) आहे. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता. तेथे पोलीस दाखल झाले होते. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नागपुरमध्ये पुन्हा हिट अॅंण्ड रन
Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारची महिलेला धडक; थरकाप उडवणारा अपघाताचा CCTV VIDEO व्हायरल

या सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की, भाजीपाल्याच्या गाडीवर काही लोक भाजी खरेदी करत आहेच. तितक्यात एक कार वेगात येते अन् भाजीपाल्याच्या गाडीला जोराची धडक देते. ही सीसीटीव्ही केडीके कॉलेज चौकातील (Accident News) आहे. आता या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यानंतर नागपूरातुन देखील मोठ्या प्रमाणावर हीट अॅण्ड रनच्या घटना समोर आलेल्या आहेत.

नागपुरमध्ये पुन्हा हिट अॅंण्ड रन
Kolhapur Bus Accident: शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात, मुलींचा आक्राेश; कर्नाटक पाेलिस धावले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मदतीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com