Pune Hadapsar Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

Hadapsar Crime News: अल्पवयीन मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्याच्या (Pune) हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीवर वडील, काका आणि भावाने बलात्कार केला आहे. हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा हडपसर पोलिस (Hadapsar Police) तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नात्याला काळीमा फासणारी ही घटना हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये घडली आहे. १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केली. हा सर्व प्रकार जुलै २०२२ ते १० जून २०२४ या कालावधी दरम्यान घडला. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तिघांविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडील, चुलत भाऊ आणि चुलत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते.

हडपसर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान ३७६, ३७६ (आय), ३२३, ५०६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका आणि चुलत भाऊ यांच्यासोबत हडपसरच्या मांजरीमधील घुलेनगर परिसरात राहते. जुलै २०२२ मध्ये चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला होता. मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा घेत त्याने लोखंडी रॉडचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने ही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुलीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला होता. मुलगी घरामध्ये एकटी झोपली होती त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेत तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. वडील दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. हडपसर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT