HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Karnataka News: बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
HD Revanna
HD RevannaSaam Tv

HD Revanna:

बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचे पथक आज त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नवीन प्रकरणात म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजा नगर येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तक्रारदाराने सांगितले की, रेवन्नाने त्याच्या आईचे अपहरण केले होते.

HD Revanna
Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

तरुणाने सांगितले की, 6 वर्षांपूर्वी त्याची आई होलेनारसीपुरा येथील रेवन्ना यांच्या घरी काम करायची. 3 वर्षांपूर्वी ती काम सोडून आपल्या गावी परतली. मुलाच्या म्हणण्यानुसार, 5 दिवसांपूर्वी रेवन्नाचा सहकारी सतीश बबन्ना त्यांच्या घरी आला होता आणि पोलीस चौकशीसाठी येऊ शकतात, त्यांना काहीही सांगू नकोस, असे सांगितले.

तक्रारदाराने म्हटले आहे की, ''29 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सतीश बबन्ना आमच्या घरी आला. तुझी आई पोलिसांच्या नजरेत आली तर तुमची अडचणीत याल. यामुळे सगळे तुरुंगात जाऊ शकतात, असे ते म्हणाले. ते म्हणाले होते की, रेवन्नाने माझ्या आईला घेऊन यायला सांगितले आहे. यानंतर तो माझ्या आईला मोटरसायकलवर घेऊन गेला.''

HD Revanna
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

तरूणाने सांगितले की, आपल्या आईला कुठे नेले आहे, हे माहित नाही. त्याने सांगितले की, यानंतर 1 मे रोजी त्याला एका मित्राचा फोन आला. ज्याने सांगितले की, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या आईला दोरीने बांधलेलं आहे आणि प्रज्वलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आईच्या जीवाला धोका असून तिला शोधण्यासाठी पोलिसांना मदतीची गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com