Mumbai-Pune Train Video: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत २ ट्रेन रद्द

Intercity Express And Deccan Express: पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
Mumbai-Pune Train Video: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत २ ट्रेन रद्द
Mumbai-Pune TrainSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

मुंबई-पुणे असा रेल्वेने (Mumbai-Pune Train) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन येत्या २८ ते ३० जून दरम्यान बंद राहणार आहे. पुणे-मुंबई -पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस (intercity express) आणि डेक्कन एक्स्प्रेस (deccan express) रद्द असणार आहे. पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २८, २९ आणि ३० जून रोजी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या २ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या ट्रेन ३ दिवस धावणार नाहीत. शुक्रवार २८ जून रोजी पुणे- मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. शनिवार २९ जून रोजी मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. तर त्याच दिवशी पुणे -मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस देखील धावणार नाही. रविवार ३० जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

Mumbai-Pune Train Video: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत २ ट्रेन रद्द
Pune News: कोयता गॅंगचा सूत्रधार मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर, राऊतांचा गंभीर आरोप

पुणतांबा-कानेगाव आणि दौंड-मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाने इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईवरून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे नोकरीनिमित्त किंवा इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांना इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस ३ दिवस रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. या दोन्ही ट्रेन अगदी कमी तासांमध्ये पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत आणि मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना पोहचवते. त्यामुळे या ट्रेनल प्रवाशांची चांगली पसंती असते.

Mumbai-Pune Train Video: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत २ ट्रेन रद्द
Mumbai Water Shortage: मुंबईकरांची चिंता वाढली; सातही धरणांमध्ये आता इतकाच पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com