Shreya Maskar
नाशिकजवळील रामशेज किल्ला हा एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय ट्रेकिंग पॉईंट आहे.
नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचे नाव प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या तेथे वास्तव्यामुळे पडले आहे. 'राम' (प्रभू श्रीराम) + 'शेज' (विश्रांतीची जागा) = रामशेज
वनवासात असताना प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ या डोंगरावर विश्रांती घेतली होती, असे बोले जाते.
रामशेज किल्ला मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याने मुघल बादशहा औरंगजेबाच्या अफाट सैन्याला साडेसहा वर्षांहून अधिक काळ झुंजवत ठेवले होते.
रामशेज किल्ला मोकळ्या मैदानावर असूनही, ताकदीच्या जोरावर हा किल्ला अभेद्य राहिला, ज्यामुळे मुघलांना तो एक कठीण 'भूत' वाटत असे.
रामशेज किल्ला हा एक ऐतिहासिक आणि नवशिक्या ट्रेकर्ससाठी उत्तम मध्यम-सोप्या ट्रेक पॉइंट आहे. मित्रांसोबत येथे नक्की जा.
नाशिक हे धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यात प्रमुख आकर्षणे म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, रामकुंड, आणि पांडवलेणी गुफा आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.