Nashik Tourism : दगडी पायऱ्या अन् भव्य प्रवेशद्वार; नाशिकमधील 'हे' ठिकाण ट्रेकर्ससाठी खास आकर्षण

Shreya Maskar

बसगड

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत वसलेला भास्करगड किल्ला बसगड या नावाने देखील ओळखला जातो. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो.

Fort | google

उद्देश काय?

प्राचीन गोंडा घाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बसगड बांधला गेला होता. हा किल्ला ऐतिहासिक व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी आणि या भागावर देखरेख ठेवण्यासाठी तैनात असलेला एक महत्त्वाचा टेहळणी बुरूज होता.

Fort | google

तटबंदी

बसगड किल्ल्यावर किल्ल्यावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी, वीर मारुतीची मूर्ती, तटबंदीचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसर आहे.

Fort | google

हरिहर किल्ला

हरिहर किल्ल्याच्या जवळ असलेला हा गड प्राचीन काळी टेहाळणीसाठी वापरला जात असे. हरिहर किल्ल्यावर पर्यटक ट्रेकिंगसाठी येतात.

Fort | google

ट्रेकिंग

भास्करगड (बसगड) ट्रेकिंगसाठी भन्नाट लोकेशन आहे. सह्याद्रीच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे.

Fort | google

कधी जावे?

पावसाळा आणि हिवाळ्यात भास्करगड किल्ल्याला भेट द्या. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढू शकता.

Fort | google

कालखंड

भास्करगड १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला. तो बहामनी, अहमदनगरची निजामशाही, मुघल आणि मराठ्यांच्या ताब्यात होता.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : रत्नागिरीत लपलेला ऐतिहासिक किल्ला, कोकणात गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

Ratnagiri Tourism | google
येथे क्लिक करा...