Ratnagiri Tourism : रत्नागिरीत लपलेला ऐतिहासिक किल्ला, कोकणात गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात आवर्जून कोकणात जा. कोकणात समुद्रकिनाऱ्यांसोबतच ऐतिहासिक ठिकाणे देखील पाहायला मिळतात.

fort | google

रत्नागिरी

कासारदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गुढे गावाजवळील एक प्राचीन, दुर्लक्षित भुईकोट किल्ला आहे, जो कुटगिरी नदीकाठी वसलेला आहे.

fort | google

कासारदुर्ग

फलशेत बंदरावरून कराडच्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर व्यापाराच्या रक्षणासाठी कासारदुर्ग किल्ला बांधला गेल्याचे मानले जाते.

fort | google

सद्य स्थिती

सध्या कासारदुर्ग किल्ल्याची बरीचशी पडझड झाली असून, केवळ खंदक, तटबंदीचे दगड आणि काही अवशेष शिल्लक आहेत

fort | google

कोकण ट्रिप

कोकणात गुहागर तालुक्यातील कासारदुर्ग हा कासारदुर्ग-माणिकदुर्ग-नवतेदुर्ग या दुर्गसमूहाचा एक भाग आहे. येथे एकदा आवर्जून भेट द्या.

fort | google

ऐतिहासिक महत्त्व

कासारदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता.

fort | google

कधी जावे?

हिवाळ्यात कासारदुर्ग किल्ल्याला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.

fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

NEXT : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...