Pune Accident VIDEO: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं

MLA Dilip Mohiten nephew Accident: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं
MLA Dilip Mohiten nephew AccidentSaam TV

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरेजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ओम भालेराव (वय १९ वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर मयुर मोहिते असं आमदार मोहिते यांच्या पुतण्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाली.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं
Pune Maval Firing CCTV : पुण्यात चाललंय काय? तळेगावात हवेत 5 राऊंड फायर; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

डोक्याला तसेच छातील मार लागल्याने अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्याने कुठलीही दयामाया न दाखवता जखमींना मदत केली नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. या अपघात प्रकरणी मयुर मोहिते याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं
Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com