Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर

Pimpari-Chinchwad CCTV: सासरच्या लोकांनी अपहरण करत महिलेला इंजेक्शन देऊन मारहाण केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर
Pimpari Chinchwad CCTVSaam Tv

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरातून एक धक्कादाक बातमी समोर येत आहे. सासरच्या लोकांनी अपहरण करत महिलेला इंजेक्शन देऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) देखील समोर आला आहे. महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेली महिला मुळची पुणे जिल्ह्यातल्या मंचर येथील आहे. तिचे २०२३ मध्ये लग्न झाले होते. ती सध्या दिघी येथे राहते. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका बिल्डरच्या कार्यालयामध्ये ही महिला कामाला आहे. महिलेच्या सासरकडची लोकं तिच्या कार्यालयाजवळ आले आणि त्यांनी तिचे अपहरण केले. घटस्फोटासाठी महिलेवर दबाव टाकला जात होता. त्यासाठीच सासरच्या मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. अपरहणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर
Pimpari Chinchwad: ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या, तपासातून धक्कादायक माहिती उघड; पोलिसांनी उद्धवस्त केलं सेक्सटॉर्शनचे कॉल सेंटर

सासरच्या मंडळींकडून कशी तरी सुटका करत या महिलेने थेट वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. महिलेने पोलिसांना अपहरणाचे सीसीटीव्ही फूटेज दिले तरी देखील पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला. महिलांच्या छळवणूक प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ती तत्काळ दाखल करण्याचे गृहविभागाने आदेश दिलेले असताना देखील वाकड पोलिस एवढ्या गंभीर प्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ करतायत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर
Mumbai-Pune Train Video: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत २ ट्रेन रद्द

दरम्यान याप्रकरणी वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना विचारलं असता त्यांनी आपण इतर ठिकाणी बंदोबस्तात असल्याने तक्रार घेण्यास थोडा विलंब झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व तांत्रिक बाबी तपासून तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला जाईल असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Pimpari-Chinchwad: अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देत केली मारहाण, महिलेचा आरोप; CCTV आला समोर
Pune News: कोयता गॅंगचा सूत्रधार मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर, राऊतांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com