Mojtaba Khamenei : युद्धातून सर्वात मोठी बातमी, इराणच्या मोजतबा खामेनींवर तब्बल ८३ कोटींचं बक्षीस

Mojtaba Khamenei latest news : अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर मोजतबा खामेनी आणि त्यांच्या जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्यास अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केल्याची मोठी घडामोड समोर आली आहे. या निर्णयामुळे इराणवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Iran Leader Mojtaba Khamenei Latest News Update : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) आणि त्यांच्या ९ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यास १ कोटी डॉलर्सचे (सुमारे ८३ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' अंतर्गत माहिती देणाऱ्याला सुरक्षित स्थलांतराचीही ऑफर दिलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) द्वारे इराणची राजवट संपवण्याचा थेट इशारा दिला आहे.

'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' अंतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीला केवळ बक्षीसच नाही, तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची ऑफरही अमेरिकेने दिली आहे.२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. यातून इराणवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणची अंतर्गत यंत्रणा कमकुवत करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे, हा या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत मोजतबा खामेनी?

अयातुल्ला अली खामेनी यांचा हा दुसरा मुलगा असून ते एक कट्टरपंथीय आणि प्रभावशाली रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'वर त्यांची मोठी पकड आहे. २०१९ मध्येच अमेरिकेने त्यांच्यावर कडक निर्बंध लादले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com