Balushahi Recipe: गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट बालुशाही, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

बालुशाही बनवण्यासाठी मैदा, तूप, बेकिंग सोडा, दही, साखर, पाणी आणि वेलची पावडर लागते. सजावटीसाठी पिस्ता किंवा बदाम वापरू शकता.

Balushahi Recipe | Saam Tv

पीठ मळण्याची पद्धत

एका भांड्यात मैदा, तूप, बेकिंग सोडा आणि दही घालून हलकेच मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे.

Balushahi Recipe | Saam Tv

गोळे तयार करा

तयार केलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्यांना थोडे चपटे करा. मध्ये हलका खळगा तयार केल्यास बालुशाही छान दिसते.

Balushahi Recipe | Saam Tv

तळून घ्या

कढईत तूप किंवा तेल गरम करून मंद आचेवर बालुशाही सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. मंद आचेवर तळल्याने ती खुसखुशीत होते.

Balushahi Recipe | Saam tv

साखरेचा पाक तयार करा

दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची पावडर घालून चव वाढवा.

Balushahi Recipe | Saam Tv

पाकात बुडवणे

तळलेल्या गरम बालुशाही साखरेच्या पाकात काही मिनिटे बुडवून ठेवा, त्यामुळे त्यात गोडवा व्यवस्थित मुरतो.

Balushahi Recipe | yandex

सजावट आणि सर्व्हिंग

शेवटी पिस्ता किंवा बदामाने सजवून बालुशाही सर्व्ह करा. सणासुदीला किंवा खास प्रसंगी ही गोड डिश सर्वांना आवडते.

Balushahi Recipe | Saam Tv

Kanjeevaram Saree Types: लग्न ते सणांसाठी परफेक्ट; कांजीवरम साडीचे 7 ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Kanjeevaram Saree Types | Saam Tv
येथे क्लिक करा