8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; 'या' कर्मचाऱ्यांची होणार सर्वाधिक पगारवाढ

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाचा सर्वाधिक फायदा लेव्हल १ ते ५च्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतव आयोगाबाबत महत्त्वाची बातमी

पगारवाढ किती होणार?

सर्वाधिक फायदा लेव्हल १ ते ५ कर्मचाऱ्यांना होणार

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. दरम्यान, प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून वेळ आहे. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. कोणत्या लेव्हलसाठी किती पगारवाढ होणार असा प्रश्न पडलेला आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मेडिकल अलाउंस २०,००० रुपयांपर्यंत वाढणार; जाणून घ्या ८ व्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट

आठव्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेव्हल १ ते लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा अंदाज आहे. याचसोबत महागाई भत्ता कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू झाला आहे. हा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यासाठी २०२७ पर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान, या कालावधीसाठी एरियर मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगात १४.२७ टक्क्यांची पगारवाढ झाली होती. त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगात पगारवाढ १८ ते २४ टक्के करण्याची शक्यता आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका असणार आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. त्यामध्ये बेसिक सॅलरी १८,००० रुपये होती. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९० ते २.०८ होऊ शकतो. त्यामुळे पगारवाढ चांगली होई शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर १.९२ होऊ शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात वेतन रचना बदलणार; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय परिणाम होणार?

जर फिटमेंट फॅक्टर १.९२ निश्चित झाला तर बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ३४,५६० होऊ शकतो. याचसोबत महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन ९००० रुपये आहे. आठव्या वेतन आयोगात ही पेन्शन १५,००० ते २०,००० होण्याची शक्यता आहे. कमाल पेन्शन १.२५ लाख होऊ शकते. आठव्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेव्हल १ ते लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com