8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात वेतन रचना बदलणार; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय परिणाम होणार?

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगातील पगार रचनेत महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता अशा सर्व गोष्टींमध्ये बदल अपेक्षित आहे.
Published on
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

वेतन रचनेत केला जाणार बदल

फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगारवाढ

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ येण्यास अजून वेळ आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. पगारवाढीसाठी सध्याच्या बेसिक सॅलरीला फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते. त्यानंतक नवीन पगार ठरवला जातो. दरम्यान, फिटमेंट फॅक्टर किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष आले आहे. काही संघटनांच्या मते फिटमेंट फॅक्टर २ ते ३.६ पर्यंत होऊ शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये NC-JCM आणि ऑल इंडिया रेल्वेमेंस फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांनी संकेत दिले आहेत. परंतु अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांनी म्हटलं की, फिटमेंट फॅक्टर हा खूप संवेदनशील मुद्द आहे. यावर वेगवेगळ्या संघटनांनी आपले मत मांडले आहे. याबाबत कोणतीही घोषणा करणे योग्य नसणार आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, सरकारसमोर एक कॉमन मेमोरेंडम ठेवणार आहे. त्यावर अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव ठेवला जाईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: ₹५७,००० बेसिक सॅलरी, वर्षाला ७ टक्के पगारवाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

वेतन रचनेत बदल करण्याची तयारी

सरकार फिटमेंट फॅक्टर नव्हे तर संपूर्ण वेतन रचनेत बदल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये महागाई भत्ता, कमीत कमी सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टर ठरवला जाईल. यामुळे संपूर्ण खर्चात बदल होईल.

जर सध्याची बदललेली सामाजिक आर्थिक परिस्थिती पाहता पगारवाढीत याचा विचार केला नाही तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे निवेदन तयार केले जाणार आहे. यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com