Victims of Pune IT job scam gather as police arrest accused in Kharadi fake placement racket. Saam tv
मुंबई/पुणे

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Radiant Edtech Fraud Kharadi Pune Details: पुण्यातील खाराडी भागात आयटी नोकरीच्या आमिषाने ३०० हून अधिक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूकीचा प्रकार उघडकीस झाला आहे.

Akshay Badve

आयटी कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. खाराडी येथील रेडीयंट एडटेक एल.एल.पी. आणि रेडीयंट आयटी सर्व्हिसेस या कंपन्यांच्या व्यवस्थापनाविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केलीय.

आय टी हब म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात दररोज शेकडो तरुण नोकरीच्या शोधात असतात. पुणे शहरात नोकरी करून पुढे चांगलं आयुष्य जगता येईल असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी मिळेल तो पर्याय आणि पडेल ते काम करण्यासाठी अनेक जणं प्रयत्नशील असतात. आय टी क्षेत्रातील बड्या कंपनी मध्ये नोकरी लावून देतो असे सांगणाऱ्या अनेक कन्सल्टन्सी कंपन्या आज पुण्यात कार्यरत आहेत. नोकरी शोधण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पैसे लुटायचे आणि थातुर मातुर कंपनी मध्ये काही काळासाठी त्याला नोकरी लावून द्यायची पण ती कंपनी खरंच अधिकृत आहे का मान्यताप्राप्त आहे का याबद्दल कोणालाच काही माहिती नाही असंच एक रॅकेट पुण्यातील खराडी भागातून समोर आलं आहे.

कंपनीने आय टी क्षेत्रात जॉब मिळवून देणार अशी जाहिरात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर केली होती. या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून शेकडो तरुण या कंपनीकडे येत असे. एखाद्याला नोकरी हवी असेल तर रेडियंट कंपनी संबंधित तरुणाला त्यांच्याकडे असलेले पर्याय सांगत असे. ३ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कंपनी मध्ये नोकरी हवी असेल तर सुरवातीला एक लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला चांगली पगारपुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळवाढ मिळेल असे स्वप्न दाखवले जात असे. एकदा तरुण जाळ्यात अडकला की त्याच्याकडून पैसे काढायचे एखाद्या कंपनी मध्ये त्याला पाठवून जॉइन करून घेत मात्र तीच कंपनी प्रोजेक्ट नसल्यामुळे पगार उशिरा होईल असं सांगत असे.

पुण्यातील रेडियंटं कंपनीने तरुणांना नामांकित आयटी कंपन्यांमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही उमेदवारांना कंपनीतच कामावर घेतले गेले आणि काही महिन्यांपर्यंत पगारही दिला गेला. मात्र, नंतर पगार देणे थांबवण्यात आले आणि आश्वासन दिलेल्या नोकऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. यातील अनेक तरुण ग्रामीण भागातून आलेत तर काही जणांनी याठिकाणी पैसे भरायचे म्हणून कर्ज सुद्धा काढलं आहे. राज्य भारतातून तब्बल ३०० पेक्षा अधिक तरुणांबत हा "फ्रॉड" झाल्याचं स्वतः यातील काही तरुण सांगतात. काही तरुणांनी कंपनी मध्ये जाऊन जाब विचारायचा सुद्धा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी रेडियंट कंपनीच्या मालकाला आणि एका कंपनीच्या संचालकाला अटक केलीय आणि तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त प्रशांत अमृतकर यांनी दिलीय.

भारतात सध्या नोकरी मिळण्याचे मोठं आव्हान आजच्या पिढीसमोर उभं ठाकलं आहे. सर्वोत्तम करिअर करता यावं असं स्वप्न उराशी बाळगून अनेक त्याग आणि संघर्षाच्या वाटेवर आजची तरुण पिढी नोकरीच्या शोधात वणवण फिरतीय पण दुसऱ्या बाजूला बागलबुवा कन्सल्टन्सी कंपन्या तरुणांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप करतायत. त्यामुळे नोकरी निवडताना किंबहुना मिळवताना संबंधित संस्था ही अधिकृत आणि जबाबदार आहे ना हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

सूर्यकुमार यादवनं क्रिकेटमधून संन्यास घेतला? सोशल मीडिया पोस्टवरून चर्चांना उधाण

Thread Benefits: लाल, काळा की पिवळा? हातातील धाग्याचा रंग ठरवतो तुमचं भाग्य

SCROLL FOR NEXT