Rajinikanth First Salary : रजनीकांत यांचा पहिला पगार किती होता? बस कंडक्टरचा ID फोटो व्हायरल

Shreya Maskar

साउथचे सुपरस्टार रजनीकांत

साउथचे सुपरस्टार रजनीकांत अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बंगळुरूमध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. आता कोट्यवधींचे मालक असलेल्या रजनीकांत यांचा पहिला पगार वाचून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल.

South's Superstar Rajinikanth | pinterest

अभिनय क्षेत्रात पदार्पण

रजनीकांत यांनी 1975 मध्ये 'अपूर्व रागांगल' या तमिळ नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता रजनीकांत ७५ वर्षांचे आहे. आजही आपल्या हटके स्टाइलने ते चाहत्यांना वेड लावतात.

Debut in acting field | pinterest

खरे नाव काय?

सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे बस कंडक्टरचे ओळखपत्र (ID Card) व्हायरल होत आहे. ज्यात त्यांचा पगार स्पष्ट दिसत आहे.

What is the real name? | pinterest

बस कंडक्टर म्हणून जॉब

शिवाजीराव गायकवाड हे बंगळुरूच्या 'रूट क्रमांक १०-ए' (Route No. 10A) वरील बस कंडक्टर होते. हे १९७१ मध्ये 'बंगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस' (BTS) द्वारे जारी करण्यात आलेले एक ओळखपत्र आहे.

Job as bus conductor | pinterest

पहिला पगार किती?

ओळखपत्रावर रजनीकांत यांचा मासिक पगार त्यावेळी केवळ २७५ रुपये असल्याचे दिसत आहे. जे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता रजनीकांत चित्रपटांसाठी कोटीच्या घरात मानधन घेतात.

How much is the first salary? | pinterest

'कुली' चित्रपटाचे मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी 'कुली' चित्रपटासाठी 150 - 200 कोटी रुपये मानधन घेतले होते. 'कुली' हा चित्रपट २०२५ ला रिलीज झाला असून तो सुपरहिट ठरला.

Remuneration of the film 'Coolie' | pinterest

रजनीकांत यांची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सुपरस्टार रजनीकांतची एकूण संपत्ती अंदाजे ₹430 कोटी ते ₹550 कोटीच्या आसपास आहे.

What is the wealth of Rajinikanth? | pinterest

आगामी चित्रपट

रजनीकांत लवकरच 'जेलर २' (Jailer 2) या चित्रपटात दिसणार आहेत. 2023 मध्ये 'जेलर' चित्रपट रिलीज झाला होता. चाहते आता 'जेलर २' ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Upcoming movies | pinterest

NEXT : दिसतीया भारी, नेसुनी साडी; काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही...

Gautami Patil | instagram
येथे क्लिक करा...