Shreya Maskar
आपल्या दमदार लावणीने महाराष्ट्राला घायाळ करणारी सबसे कातिल गौतमी पाटील कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गौतमीचे दिवाने आहेत.
नुकतेच गौतमीने नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेतले. ज्याचे सुंदर फोटो तिने शेअर केले आहे. फोटोंमध्ये देवाचे दर्शन घेताना दिसत आहे.
गौतमीने सुंदर मराठमोळा लूक केला आहे. तिने जांभळा-गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसली आहे. मोकळे केस, मिनिमल मेकअप, गोल्डन ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.
गौतमीच्या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तिला साडीत पाहून चाहत्यांची विकेट उडाली.
गौतमी पाटील आता प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि कॉमेडी किंग भाऊ कदम यांच्यासोबत झळकणार आहे. या दोघांचे 'हिल पोरी हिला' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात गौतमीचा एक हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.
'हिल पोरी हिला' हे गाणे ५ जूनला रिलीज होणार आहे. पहिल्यांदाच गौतमी पाटील आणि भाऊ कदम ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामुळे चाहते गाण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
गौतमी पाटील आजवर अनेक गाण्यांमध्ये झळकली आहे. अलिकडेच गौतमी पाटीलची 'सुंदरा', 'बैलगाड्याचा नाद', 'रुपेरी वाळूत', 'जाऊ दे मला बाजारी', तू मोरनी, 'छम्मो' अशी अनेक गाणी रिलीज झाली आहेत.
गौतमी पाटील 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच तिच्या 'देवमाणूस' मधील एन्ट्रीने तर चाहते खूपच खुश झाले होते.