Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Kalyan Police: कल्याणमध्ये ४ ते ५ जणांच्या टोळक्याने गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण केल्याची आणि त्यांच्या डोक्यावर दारूच्या बाटल्या फोडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कल्याण हादरले.
Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या
Kalyan CrimeSaam tv
Published On
  • कल्याणमध्ये तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला

  • दारूच्या बाटल्या तरुणाच्या डोक्यात फोडल्या

  • तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली

  • कोळशेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पूर्व परिसरात टवाळखोर तरुणांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात बसलेल्या तरुण-तरुणीवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडण्यात आल्या. तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत राहणारा तेजस चव्हाण हा जिम ट्रेनर असून तो रविवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात बसून गप्पा मारत होता. त्याचवेळी चार ते पाच तरुण तेथे आले आणि त्यांनी तेजसचा मोबाईल हातात घेतला. मोबाईल घेऊन ते निघून जात असताना तेजसने त्यांना मोबाईल परत देण्यास सांगत हटकले. त्यानंतर संबंधित तरुणांनी मोबाईल परत केला आणि तेथून निघून गेले.

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या
Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

मात्र काही वेळानंतर हेच तरुण पुन्हा त्या ठिकाणी परत आले. त्यांनी तेजससोबत हुज्जत घालत अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. टोळक्याने तेजसला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. या वेळी तेजससोबत असलेल्या तरुणीने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

याप्रकरणी तेजसने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार ते पाच अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाढत्या टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी उद्यान आणि सार्वजनिक परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या
Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com