Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू

Dahisar-Bhayander Link Road Project: दहिसर- भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. क्रेन कोसळून २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भाईंदरमध्ये खळबळ उडाली.
Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना,  क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू
Mumbai Accident Saam Tv
Published On

Summary -

  • दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पात मोठी दुर्घटना

  • क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळून २ कामगारांचा मृत्यू

  • कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

मनोज तांबे, भाईंदर

दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. लिंक रोडच्या बांधकाम प्रकल्पातील कास्टिंग यार्डमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. गॅन्ट्री क्रेनला जोडलेला उंच प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली. भाईंदर पश्चिम येथील लिंक रोड प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एल अँड टी या कंपनीकडून सुरू असून या दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गॅन्ट्री क्रेनला जोडलेला उंच प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या क्रेनच्या वरच्या भागात कामगारांना उभे राहून काम करता यावे यासाठी सुमारे १२ मीटर उंचीवर एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. हा प्लॅटफॉर्म कोसळला. या अपघातामध्ये रघुनाथ भक्तबल्लव दास (वय ३८ वर्षे) आणि कला महिंदर सिंग (वय ४५ वर्षे) या दोन कामागारांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ दास हे मूळचे ओडिशाचे होते तर कला महिंदर सिंग हे पंजाबचे होते. या अपघातानंतर दोघांचे मृतदेह भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आले.

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना,  क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू
Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा! SRA प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार; ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

घडलं असं की, दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या कास्टिंग यार्डमध्ये जड गर्डर हलवण्यासाठी गॅन्ट्री क्रेन बसवण्यात आली आहे. या क्रेनच्या वरच्या भागात कामगारांना उभे राहून काम करता यावे यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. या प्लॅटफॉर्मवर उभं राहून काही कामगार काम करत होते. काम सुरू असताना हा प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने त्यावर काम करणारे दोन्ही कामगार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना,  क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू
Mumbai Crime : आधी वीट मारली, मग गळा दाबला; वांद्र्यातील वृद्ध महिलेच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे सत्य समोर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून प्लॅटफॉर्म कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड, देखभालीतील त्रुटी किंवा निष्काळजीपणा यापैकी नेमके कारण काय? याचा शोध घेण्यात येत आहे. पुढच्या तपासानुसार संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना,  क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू
Mumbai death mystery: 'त्या' चौघांचा मृत्यू कलिंगडमुळे नाहीच; FDA च्या नव्या अहवालाने पेच अजूनच वाढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com