Pune Rain x
मुंबई/पुणे

Pune Rain : पुण्यात पावसाचे रौद्ररुप! रस्त्यांना नदीचे स्वरुप, बाईकसह तरुण पावसाच्या पाण्यात वाहून गेला अन्...

Pune News : पुण्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघोलीत एक बाईकस्वार पावसात वाहून जात असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओत तरुणाची बाईक पाण्यात बुडाल्याचे दिसते.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल रात्री (१३ जून) झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्याच्या वाघोलीत एक बाईकस्वार पावसात वाहून गेला. बाईकस्वार पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाघोलीतील केसनंद फाट्यावरचा असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. तेव्हा एक बाईकस्वार पाण्यात वाहून जात होता. त्याची बाईक पाण्यात पूर्णपणे बुडाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना पुण्यातील वाघोली येथे घडली आहे. सुदैवाने बाईकस्वार तरुणाला काहीही झाले नसून तो सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. पण या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वयोवृद्ध महिला नाल्यात वाहून गेली...

पुण्यातील नवले पुलाजवळील नाल्यात वाहून गेलेल्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शोभा मनोहर महिमाने (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ आढळून आला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले. १२ जूनच्या रात्री ही महिला नवले पुलाजवळच्या नाल्यात वाहून गेली होती.

फुरसंगी येथील रहिवासी असणाऱ्या शोभा महिमा यांनी कोल्हापूर ते पुणे असा लांबचा प्रवास केला होता. त्या बंगळुरू महामार्गावरील पुलावर उतरल्या. रिक्षा पकडण्यासाठी त्यांनी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शोभा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यात पडल्या आणि पाण्यात वाहून गेल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ आढळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Mask : मेथीच्या दाण्यांच्या हेअर मास्कने केस गळती थांबवा

Make Yourself Happy: स्वतःला खुश ठेवण्याचे हे ७ मार्ग माहिती आहेत का?

Solar Agri Pump: सौर कृषी पंपची चोरी झालीय? कुठे कराल तक्रार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

Ind vs Eng: एक ओव्हर, दोघे गारद; भारताच्या नितीशकुमार रेड्डीचा इंग्लंडला जोरदार दणका

Kids Health Tips: लहान मुलांना अंड खाण्यास दिल्यानंतर दुध किती तासांनी द्यावे?

SCROLL FOR NEXT