Air India Plane Crash Video: विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाची चौकशी, मोठी माहिती समोर येणार

Ahmedabad Plane Crash First Video : गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान दुर्घटनाचा पहिला व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
Ahmedabad Plane Crash First Video
Ahmedabad Plane Crash First VideoX
Published On

Ahmedabad Plane Crash या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडीओमध्ये एअर इंडियाचे विमान नागरी वस्तीच्या अतिशय जवळून जाताना आणि त्यानंतर तेथे कोसळताना स्पष्ट दिसते. हा व्हिडीओ एकदम अचूक वेळेला रेकॉर्ड करण्यात आला. अपघात इतक्या अचूकवेळी कसा रेकॉर्ड करण्यात आला असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हायरल व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

विमानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचे नाव आर्यन आहे, तो नुकताच गावावरुन अहमदाबादला त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने अनावधाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे विमान दुर्घटनेची दाहकता जगासमोर आली. विमानतळावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली. पण आर्यनने काढलेला व्हिडीओ अगदी जवळून रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे. आर्यनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास पोलीस करणार आहेत.

Ahmedabad Plane Crash First Video
Ahmedabad Airplane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कसा झाला? कारण आले समोर

आर्यनने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये घटनेबाबत माहिती दिली. फक्त उत्सुकतेपोटी व्हिडीओ रेकॉर्ड केला. विमान जवळून जात असल्याचे गावातील मित्रांना, लोकांना दाखवायचे होते म्हणून व्हिडीओ काढला असे आर्यनने म्हटले आहे. विमानाचा स्फोट झाला, त्यानंतर त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करणे बंद केले. स्फोटामुळे तो घाबरला अशी माहिती आर्यनच्या बहिणीने दिली.

Ahmedabad Plane Crash First Video
Ahmedabad Airplane Crash मध्ये २७४ जणांचा मृत्यू, 'त्या' ३३ जणांच्या कुटुंबियांना देखील १ कोटी रुपये मिळणार

पोलिसांनी चौकशीसाठी आर्यनला ताब्यात घेतले आहे. ज्या नातेवाईकांच्या घरी आर्यन होता, त्यांनी आणि त्यांच्या शेजारच्यांनी आर्यनला चौकशीसाठी बोलावण्याच्या प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन नुकताच गावावरुन आला होता. त्याच्यासाठी विमान पाहणे नवीन होते, कुतूहलापोटी त्याने व्हिडीओ काढला असे त्यांनी म्हटले आहे.

Ahmedabad Plane Crash First Video
Team India : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, आयसीसी लवकरच घेणार निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com