Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: अवयवांना गंभीर इजा अन्..; डॉक्टरांच्या अंगाला काटा, हिंजवडीतील तरूणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर; धक्कादायक बाबी उघड

Pune Engineer Abhilasha: २५ वर्षीय अभियंता तरुणीने इमारतीच्या २१व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आणि सुसाईड नोट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील हिंजवडीत एका अभियंता तरूणीने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं. तिने टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सकाळी ४:३० वाजता ती सोसायटीमध्ये शिरली. लिफ्टमधून २१ व्या मजल्यावर गेली आणि तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे (वय वर्ष २५) असे मृत तरूणीचे नाव आहे. तिने हिंजवडीतील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अभियंता तरूणीच्या आत्महत्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती. 'सॉरी मला माफ करा, मी स्वच्छेनं माझं आयुष्य संपवत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे', असं तिनं चिठ्ठीत लिहिलं होतं.

अभिलाषाचा आत्महत्या करण्यापूर्वीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये लिफ्ट दिसत आहे. लिफ्टमध्ये तरूणी शिरते आणि २१ मजल्यावर जात असल्याचं दिसत आहे. तरूणीने स्कार्फ बांधले असल्याचं दिसत आहे. दरम्यान, तरूणीने आत्महत्या का केली? तरूणीनं टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Holidays: सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्ट्या|VIDEO

Maharashtra News Live Update: पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर

Ethanol blending in petrol: E20 नव्हे 420! पेट्रोलमध्ये 30टक्के इथेनॉल आढळल्यानं राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Ghee Tea Benefits : चहात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं? तूप घातलेला चहा का, कोणी प्यावा, समजून घ्या

भाजपच्या 12 वर्षांच्या सत्तेवर सोनिया गांधी संतापल्या; म्हणाल्या, देशाचं मोठं नुकसान झालं|VIDEO

SCROLL FOR NEXT