Shocking: संतापजनक! आईनं पोटच्या लेकीला बॉयफ्रेंडच्या हवाली केलं; पीडितेवर नराधमांचे अत्याचार, आरोपी महिलेचं राजकीय कनेक्शन

Haridwar Crime Case: स्वतःच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसह अन्य एका मित्राच्या हवाली केलं. त्या दोघांनी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
 Crime
CrimeSaam
Published On

मायलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये उघडकीस आली आहे. स्वतःच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसह अन्य एका मित्राच्या हवाली केलं. त्या दोघांनी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी महिलेविरोधात पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी महिला ही भाजपच्या महिला आघाडीची जिल्हाध्यक्षा होती. मात्र, काही काळापासून ती पक्षकार्यात सक्रिय नसल्यानं तिची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेला सदस्यत्वातूनही काढून टाकले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आशुतोष शर्मा यांनी आरोपी महिलेला पक्षातून काढून टाकले असल्याची माहिती दिली.

 Crime
Pune Aundh: 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..

या प्रकरणाची माहिती देताना एसएसपी हरिद्वार यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात फिरायला जाण्याच्या बहाण्याने आरोपी महिला आपल्या लेकीला बॉयफ्रेंड आणि एका मित्रासोबत भेल स्टेडियमला घेऊन गेली. तिघेही कारमधून गेले होते. महिलेच्या संमंतीने दोन नराधमांनी १३ वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत जबरदस्ती केली.

 Crime
Crime News: प्रायव्हेट पार्ट अन् शरीरावर स्क्रू ड्रायव्हरने वार, बॉयफ्रेंडनं शेतात बोलावून गर्लफ्रेंडला संपवलं

नंतर पीडितेला हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेनं वडिलांना आपबिती सांगितली. पीडितेनं आणि तिच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात मुलीसोबत बलात्कार झाले असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तातडीने तपास करीत महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तसेच न्यायालयात हजर केले आहे. मात्र तिसरा आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com