Pune Tragedy: स्कार्फ बांधून लिफ्टमध्ये शिरली, २१ व्या मजला येताच..हिंजवडीतील अभियंता तरूणीचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

25-Year-Old Engineer Jumps to Death: हिंजवडीतील एका सोसायटीमध्ये बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. २५ वर्षीय अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या अभियंता तरुणीनं २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
Pune Crime
Pune CrimeSaam
Published On

पुण्यातील हिंजवडीत एका २५ वर्षीय अभियंत तरूणीनं २१ व्या मजल्यावरून आत्महत्या केली. 'सॉरी मला माफ करा, मी स्वच्छेनं हे पाऊल उचलत आहे, माझी आता जगायची इच्छा नाही' असं म्हणत तिनं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ तरूणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आत्महत्या करण्यापूर्वी तिने काय काय केलं, हे समोर आलं आहे.

अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असे २५ वर्षीय मृत तरूणीचे नाव आहे. तिनं हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली होती.

Pune Crime
Ambernath: माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला, रस्त्यावर रक्ताचे पाट; अंबरनाथमध्ये रक्तरंजित थरार

त्यानंतर लिफ्टने घरी २१ व्या मजल्यावर पोहोचली. लिफ्टमध्ये ती शांतपणे उभी होती. तिने स्कार्फ बांधलेला होता. ४ वाजून ४२ मिनिटांनी ती लिफ्टमधून बाहेर पडली. नंतर २१ व्या मजल्यावरून उडी घेत तिने आयुष्य संपवलं. जोरात आवाज आल्यानंतर सोसायटीतील रहिवासी खडबडून जागे झाले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं.

अभिलाषाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Pune Crime
Shocking: संतापजनक! आईनं पोटच्या लेकीला बॉयफ्रेंडच्या हवाली केलं; पीडितेवर नराधमांचे अत्याचार, आरोपी महिलेचं राजकीय कनेक्शन

प्राथमिक तपासात अभिलाषाने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी खोलीची झडती घेतली. खोलीमध्ये तिने लिहिलेली एक सुसाइट नोट सापडली. तिने सुसाईड नोटमध्ये आपल्या आई- वडिलांची आणि मैत्रिणींची देखील माफी मागितली. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com